घरताज्या घडामोडीCorona Vaccine : देशात कोरोना लसीची चोरी; राजस्थानमध्ये उडाली खळबळ

Corona Vaccine : देशात कोरोना लसीची चोरी; राजस्थानमध्ये उडाली खळबळ

Subscribe

राजस्थानमध्ये चक्क कोरोना लसीची चोरी करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी पुन्हा एकदा देशातील सर्वच यंत्रणाला कामाला लागली आहे. तर दुसरीकडे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लसीकरण देखील तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे सध्या देशात लसीकरण मोहिमेला उत्तम प्रतिसाद मिळत असून नागरिकही मोठ्या संख्येने लसीकरण करुन घेत आहे. मात्र, लसीकरण करणाऱ्यांची संख्या वाढल्यामुळे आता बऱ्याच राज्यात लसीकरणाचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यातच राजस्थानमध्ये चक्क कोरोना लसीची चोरी करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही देशातील पहिलीच घटना आहे.

राजस्थानची राजधानी जयपूर येथील एका सरकारी रुग्णालयातून लसीकरणाची चोरी झाल्याची माहिती समोर आली आहे. या लसीकरण केंद्रातून ३२० को-वॅक्सिनचे डोस चोरण्यात आले आहेत. याप्रकणी आरोग्य विभागाने अज्ञात चोराविरोधात गुन्हा दाखल केला असून आरोग्य विभागही याची तपासणी करणार आहेत.

- Advertisement -

सीसीटीव्ही फुटेज नाही

धक्कादायक बाब म्हणजे ज्याठिकाणाहून लस चोरण्यात आली आहे. त्या ठिकाणचे केवळ सीसीटिव्ही कॅमेरे कार्यरत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या संगनमताने ही चोरी केली गेली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. तसेच बेकायदेशीर लस देणाऱ्यांचे रॅकेट असल्याचा संशय देखील पोलिसांनी व्यक्त केला आहे.

सर्वाधिक लसीकरण

देशातील सर्वच राज्यांमध्ये सध्या लसीकरण मोहिम सुरु आहे. त्यातील राजस्थान हे देशातील सर्वाधिक लसीकरण करणारे दुसरे राज्य बनले आहे. ’१२ एप्रिलपर्यंत १ कोटी लोकांनी लसीकरण केले असून राज्यातील इतरही नागरिकांनी लसीकरण करुन घ्यावे’, असे आवाहन राज्याचे वैद्यकीय व आरोग्य मंत्री डॉ. रघु शर्मा यांनी केले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – लसीकरणामुळे नाही तर गर्भ निरोधक गोळ्या आणि धूम्रपाने होतात रक्ताच्या गुठळ्या


 

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -