४९ व्या सरन्यायाधीश पदासाठी सिंधुदुर्गच्या उदय लळीत यांच्या नावाची शिफारस

४९ व्या सरन्यायाधीश पदासाठी सिंधुदुर्गच्या उदय लळीत यांच्या नावाची शिफारस

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन.व्ही.रमणा यांनी त्यांचा उत्तराधिकारी म्हणून न्यायमूर्ती उदय लळीत यांच्या नावाची शिफारस केली आहे. त्यामुळे उदय लळीत २७ ऑगस्ट रोजी ते भारताचे ४९ वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्विकारणार आहेत. उदय लळीत हे मुळचे सिंधुदुर्गचे असून त्यांचं बालपण मुंबईत गेलंय. त्यामुळे त्यांच्या सरन्यायाधीशपदी नियुक्ती झाल्यानंतर अवघ्या महाराष्ट्राची मान उंचावणार आहे. (Uday lalit will become chief justice of India)

हेही वाचा – कोण आहेत उदय लळीत, सिंधुदुर्गाशी त्यांचा संबंध काय?

सरन्यायाधीश ए. व्ही. रमणा यांनी स्वतः गुरुवारी (४ ऑगस्ट) केंद्र सरकारला दिलेल्या आपल्या ३ ऑगस्टच्या शिफारस पत्राची प्रत न्यायमूर्ती यू. यू. लळीत यांच्याकडे सोपवली. २६ ऑगस्ट रोजी एन.व्ही. रमणा यांचा कार्यकाळ संपणार असल्याने २७ ऑगस्ट रोजी उदय लळीत हे शपथ घेतील. तसेच, लळीत ८ नोव्हेंबर २०२२ पर्यंत सरन्यायाधीश पदावर असतील. तेही ८ नोव्हेंबरला निवृत्त होण्याआधी अशाचप्रकारे पुढील सरन्यायाधीशाच्या नावाची शिफारस करतील, असं सूत्रांकडून सांगण्यात येतंय.

१९८३ पासून उदय लळीत यांनी वकिलीला सुरुवात केली. काही वर्षे दिवंगत ज्येष्ठ वकील एम.ए.राणे यांच्याकडे काम केलं. त्यानंतर ते दिल्लीला गेले. ज्येष्ठ विधितज्ज्ञ सोली सोराबाजी यांचे ते सहा वर्षे निकटचे सहकारी होते. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात त्यांनी स्वतंत्रपणे वकिलीही केली.

२ जी स्पेक्ट्रम घोटाळा प्रकरण हाताळले

उदय लळीत यांनी आतापर्यंत अनेक हायप्रोफाईल प्रकरणे हाताळली आहे. मात्र, तरीही ते प्रसिद्धीझोतापासून दूर राहिले. २जी स्पेक्ट्रम हा सर्वांत मोठा भ्रष्टाचार घोटाळा लळीत यांनीच चालवला होता.

 

First Published on: August 4, 2022 12:41 PM
Exit mobile version