Russia-Ukraine Conflict: रशियाने आण्विक सैन्याला तयार राहण्याच्या दिल्या सूचना, या निर्णयामागे ब्रिटिश नेत्याला ठरवलं जबाबदार

Russia-Ukraine Conflict: रशियाने आण्विक सैन्याला तयार राहण्याच्या  दिल्या सूचना, या निर्णयामागे ब्रिटिश नेत्याला ठरवलं जबाबदार

गेल्या पाच दिवसांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये युद्ध सुरू आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी शनिवारी आपल्या आण्विक सैन्याला हाय अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या. NATO आणि EU देशांतील नेत्यांच्या प्रक्षोभक भाषणांसाठी आण्विक सैन्याने तयार राहावे, असा आदेश त्यांनी आपल्या संरक्षणमंत्र्यांना दिला आहे. परंतु व्लादिमीर पुतिन कोणत्या नेत्यांच्या भाषणावर नाराज होते हे अद्यापही अस्पष्ट आहे.

रशियाच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह म्हणाले, नाटो आणि रशिया यांच्यातील संघर्षाबाबत विविध उच्च पदावरील काही प्रतिनिधींच्या वतीने विधाने जारी करण्यात आली होती. आमचा विश्वास आहे की अशी विधाने पूर्णपणे अनावश्यक आहेत.

पेस्कोव्ह म्हणाले की, ट्रसने नाटो आणि मॉस्को यांच्यातील युद्धाबाबत काही विधाने केली आहेत. ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या कोणत्या विधानामुळे रशियन राष्ट्राध्यक्ष भडकले हे त्यांनी सांगितले नाही. विशेष म्हणजे रविवारी ट्रस म्हणाले की, जर रशियाला रोखले नाही तर इतर देशांनाही धोका निर्माण होईल आणि रशियाच्या नाटोसोबतच्या संघर्षातून ते संपुष्टात येईल.

लिझ ट्रसचे संपूर्ण विधान काय ?

ब्रिटनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी एका मुलाखतीत सांगितले की, हा संघर्ष युरोपच्या स्वातंत्र्य आणि लोकशाहीसाठी आहे. जर आपण पुतीनला युक्रेनमध्ये येण्यापासून थांबवले नाही, तर आपल्यासाठी धोक्याची घंटा ठरू शकते. ब्रिटन युक्रेनमध्ये जाऊन रशियाविरुद्ध लढू इच्छिणाऱ्यांना पाठिंबा देऊ शकते सत्याच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय जनतेचाच असेल, असे ते म्हणाले. ट्रस यांनी युक्रेनचे कौतुक केले आणि हा केवळ एका देशाचा लढा नाही तर संपूर्ण युरोपचा लढा आहे, असं ट्रस यांनी म्हटलं आहे.


हेही वाचा : Russia Ukraine War: २४ तासांत पंतप्रधान मोदींची तिसऱ्यांदा उच्चस्तरीय बैठक; रशिया-युक्रेन युद्धावर चर्चा


 

First Published on: February 28, 2022 10:24 PM
Exit mobile version