Ukraine Crisis: रशियाकडून यूक्रेनवर हल्ल्याची शक्यता, अमेरिकेचे दूतावासातील कर्मचाऱ्यांना तातडीने देश सोडण्याचे आदेश

Ukraine Crisis: रशियाकडून यूक्रेनवर हल्ल्याची शक्यता, अमेरिकेचे दूतावासातील कर्मचाऱ्यांना तातडीने देश सोडण्याचे आदेश

Ukraine Crisis: रशियाकडून यूक्रेनवर हल्ल्याची शक्यता, अमेरिकेचे दूतावासातील कर्मचाऱ्यांना तातडीने देश सोडण्याचे आदेश

रशिया आणि नाटोमध्ये यूक्रेनच्या मुद्द्यावर तणाव (Russia Ukraine Border Conflict) वाढत आहे. यामध्ये वेगाने हालचाली होत आहेत. संपूर्ण युरोपात हाय अलर्ट (High Alert) सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. यादरम्यान रशिया आणि अमेरिकेचे अधिकारी हे संकट टाळण्यासाठी सातत्याने बैठक घेत आहे. परंतु दुसऱ्या बाजूला अमेरिका काही अशी पाऊले टाकत आहे, ज्यामुळे युद्ध होण्याची शक्यता वाढताना दिसत आहे. अमेरिकेने आपल्या काही राजनैतिक अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांना परत बोलावले आहे.

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने अगोदरच यूक्रेनसाठी लेव्हल ४ अॅडवाइजरी जारी केली आहे. ज्यामध्ये अमेरिकन नागरिकांना सांगितले आहे की, कोरोना महामारी आणि रशियाचा वाढता धोक्याच्या पार्श्वभूमीवर यूक्रेनचा प्रवास करू नका. जेव्हा अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिक यांनी रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्जेई लावरोव यांची भेट घेतली तेव्हाच कर्मचारी नसलेल्यांना परत बोलण्याची योजना आखली. ही भेट सध्याचा तणाव दूर करण्यासाठी घेतली होती.

अमेरिकेने यूक्रेनसाठी मदतीचा हात केला पुढे

युद्धाची शक्यता असल्यामुळे अमेरिकेने यूक्रेनला मदतीचा हात पुढे केला आहे. रशियाने मोठ्या प्रमाणात सीमेवर सैनिकांना तैनात केले आहे. यादरम्यान अमेरिकेन ९० टन प्राणघातक हत्याराची मदत पोहोचवली आहे. यापूर्वी अमेरिकेने यूक्रेनला सैन्य मदतीसाठी मंजूरी दिली होती. त्यानंतर पहिल्यांदा जे सैन्य पाठवण्यात आले, ते यूक्रेनमध्ये पोहोचले आहे. यामध्ये सीमेवर तैनात सैनिकांसाठी हत्यारांचा समावेश आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी डिसेंबर महिन्यात यूक्रेनला २० कोटी डॉलर म्हणजेच १ हजार ४४८ कोटी रुपयांचे सुरक्षा सहाय्यता पॅकेज मंजूर केले होते.

रशियाचे सीक्रेट मिशन

न्यूयॉर्क टाईम्सच्या वृत्तानुसार, रशिया गुपचूपपणे यूक्रेनला घेरण्याचा प्रयत्न करत आहे. ५ जानेवारीला रशियाने कीव स्थित आपल्या दूतावासातून १८ लोकांना मॉस्कोला पाठवले. हे सर्व लोकं रस्ते मार्गाने १५ तासांचा प्रवास करून मॉस्कोत पोहोचले. त्यानंतर पुढील काही दिवसांमध्ये ३० आणखीन लोकं मॉस्कोत पाठवले. यूक्रेनमध्ये कीव व्यतिरिक्त रशियाचे दोन वाणिज्य दूतावासही आहेत. यांच्या कर्मचाऱ्यांना सांगितले की, त्यांना कोणत्याही क्षणी मॉस्कोत जाण्याचा आदेश दिला जाऊ शकतो.

अमेरिकन तज्ज्ञांच्या नुसार, रशियांना ६० बटालियन यूक्रेनच्या सीमेवर तैनात केले आहेत. एकूण मिळून रशियाच्या सैनिकांची संख्या ७७ हजाराहून १ लाख सांगितली जात आहे. एक महिन्यापूर्वी पेंटागनने ही संख्या १ लाख ७५ हजार सांगितली होती. अमेरिकन इंटेलिजेंसना वाटते की, रशिया सैन सीमेवर पूर्ण बर्फ साठण्याची वाटत पाहत आहेत. यामुळे सैनिकांना हालचाल करण्यास सोप्पे जाईल.

रशिया आणि यूक्रेनमध्ये काय आहे वाद?

यूक्रेन एक सोव्हिएत देश आहे. २०१४ मध्ये रशियाने एक मोठे पाऊल उचलत यूक्रेनचा भाग असलेल्या क्रीमियावर कब्जा केला होता. ज्यानंतर यूक्रेनच्या सैन्यात आणि रशिया समर्थित फुटीरतावाद्यांमध्ये लढाई झाली. असे म्हटले जाते की, या लढाईमध्ये १४ हजारांहून अधिक लोकं मारले गेले होते. तर २० लाख लोकांना आपले घर सोडावे लागले होते. गेल्यावर्षी अचानक रशियाने यूक्रेनच्या सीमेवर सैनिकांचा फौजफाटा वाढवला होता. ज्यानंतर अमेरिका आणि यूक्रेनने दोघांनी दावा केला की, रशिया या देशावर हल्ला करू शकते. यामुळे ते सीमेवर सैनिकांचा फौजफाटा वाढवत आहे. अमेरिका आणि युरोपने इशारा दिला आहे की, जर रशिया या देशावर हल्ला किंवा कब्जा करते, तर त्यांच्यावर कडक निर्बंध लावले जातील.

 

First Published on: January 24, 2022 11:02 AM
Exit mobile version