Russia Ukraine War : रशियाने बदलला गेमप्लॅन; 9 मे रोजी करणार मोठी घोषणा

Russia Ukraine War : रशियाने बदलला गेमप्लॅन; 9 मे रोजी करणार मोठी घोषणा

ussia Ukraine War : रशियाने बदलला गेमप्लॅन; 9 मे रोजी करणार मोठी घोषणा

युक्रेन आणि रशियामध्ये गेल्या 10 आठवड्यांपासून युद्ध सुरु आहे. या युद्धामुळे युक्रेनच्या अनेक शहरांचे मोठे नुकसान झाले. मात्र आत्तापर्यंत रशियाला केवळ युक्रेनच्या पूर्वेकडील भागात मोठे यश मिळाले आहे. तर पश्चिमेकडील प्रदेशात रशियन लष्कराला प्रवेश करण्यास अडचणी येत आहेत. यामुळे रशियाने आता आपल्या रणनीती बदल केला आहे. रशियाने पश्चिम युक्रेनच्या काही भागांवर कब्जा करण्याऐवजी पूर्वेकडील भागांवर संपूर्ण राजकीय आणि लष्करी नियंत्रण स्थापित करण्याच्या तयारीत आहे. तसेच क्रेमलिन स्थानिक प्रशासनामध्ये स्वतःचे लोक स्थापित करण्याचा प्रयत्न करीत आहे. याशिवाय स्थानिक लोकांना व्यवहारासाठी रुबल वापरण्यास सांगितले जात आहे. 2014 मध्ये जेव्हा क्रिमियाला जोडले गेले तेव्हा तेच धोरण स्वीकारले गेले होते.

संपूर्ण प्रकरणाची माहिती असलेल्या लोकांनी सांगितले की, रशिया या भागात सार्वमत घेत आहे जेणेकरून त्यांच्या विलीनीकरणासाठी आधार तयार करता येईल. याशिवाय, व्लादिमीर यांना युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांना पदावरून हटवून त्यांच्या जागी त्यांना पाठिंबा देणार्‍या व्यक्तीची नियुक्त करावी अशी इच्छा आहे. इतकेच नाही तर व्लादिमीर पुतिन हे रशियन समर्थक लोकांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आणण्याच्या धोरणावर काम करत आहेत. रशियाने 24 फेब्रुवारी रोजी युक्रेनवर हल्ला केला होता, परंतु तेव्हापासून झेलेन्स्कीने शस्त्रे ठेवण्यास नकार दिला. याशिवाय चर्चेतूनही तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे अद्यापही रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरुच आहे.

क्रेमलिनचे अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांना अजूनही खात्री आहे की, रशियन सैन्य युक्रेनचा मोठा भाग ताब्यात घेण्यास सक्षम असेल. याशिवाय डोनेस्तक आणि लुहान्स्क प्रदेशांवर पूर्ण नियंत्रण प्रस्थापित करण्याची तयारी सुरू आहे. तसेच युक्रेनच्या दक्षिणेकडील खेरसोन आणि झापोरिझ्झिया भागाचा काही भाग रशियन सैन्याने आपल्या ताब्यात घेतला आहे. हे दोन्ही प्रदेश क्रिमियाला लागून आहेत, ज्याला रशियाने 2014 मध्ये जोडले. यामुळेच रशियाला या भागात नियंत्रण प्रस्थापित करणे सोपे झाले आहे. याचे एक कारण म्हणजे रशियन संस्कृतीवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची संख्या मोठी आहे. अशा स्थितीत रशियाला ही क्षेत्रे सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या विलीन करणे सोपे जाईल.

9 मे रोजी रशिया करणार मोठी घोषणा?

याशिवाय रशियानेही परसेप्शन लेवलवर मोठी तयारी केली आहे. रशिया 9 मे हा दिवस द्वितीय विश्वयुद्धाचा विजय दिवस म्हणून आयोजित करतो. या दिवशी युक्रेनबद्दल काही घोषणाही केल्या जाऊ शकतात. या दिवशी रशियामध्ये लष्करी परेडही काढण्यात येत आहे. विशेष म्हणजे, पूर्व युक्रेनच्या मोठ्या भागात मोठ्या प्रमाणात रशियन समर्थक लोक आहेत. याशिवाय, पश्चिम भागात नाटो आणि प्रो-युरोपियन लोकांची लोकसंख्या जास्त आहे. अशा स्थितीत पूर्वेकडील भागांवर नियंत्रण प्रस्थापित करून युक्रेनचे दोन तुकडे करण्याचाही रशियाचा प्रयत्न आहे.


सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेले मर्सडीज बेबी, फडणवीसांचा आदित्य ठाकरेंवर पलटवार

First Published on: May 4, 2022 3:52 PM
Exit mobile version