Russia Ukraine War: रशियाने युक्रेनियनला मारण्यासाठी बनवली लिस्ट; अकाऊंट लॉक करण्याचा फेसबुकने दिला सल्ला

Russia Ukraine War: रशियाने युक्रेनियनला मारण्यासाठी बनवली लिस्ट; अकाऊंट लॉक करण्याचा फेसबुकने दिला सल्ला

अनेक महिन्यांपासून सुरू असलेला रशिया आणि युक्रेनमधील तणावाचे रुपांतर अखेर गुरुवारी युद्धात झाले आहे. रशियाने केलेल्या हल्ल्याच्या विरोधात जगातील अनेक देशांतील नागरिक निर्देशने करत आहेत. यादरम्यान फेसबुकने युक्रेनच्या लोकांना अकाऊंट लॉक करण्याचा सल्ला दिला आहे. फेसबुक म्हणाले की, ‘युक्रेनमधील लोकं सुरक्षेच्या कारणास्तत्व फेसुबक अकाऊंट लॉक करू शकतात. कारण रशिया युक्रेनच्या लोकांना मारण्यासाठी लिस्ट बनवत आहेत.’

फेसबुक म्हणाले की, ‘युक्रेनचे लोक ज्या लोकांना ओळखत नाही त्यांना ब्लॉक करू शकतात. तसेच ज्यांचे प्रोफाईल फोटो पाहता येऊ शकत नाही किंवा डाऊनलोड करता येऊ शकत नाही, त्यांचे अकाऊंटही ब्लॉक करू शकतात. अफगाणिस्तानवर तालिबानने कब्जा केल्यानंतर या सोशल मीडियावर प्लॅटफॉर्मवर एक टूल अॅड केले आहे.’ दरम्यान अमेरिकेने संयुक्त राष्ट्रात इशारा दिला होता की, ‘रशियन सैनिक युक्रेनियन लोकांना मारण्याची आणि कब्जा केल्यानंतर कँपमध्ये पाठवण्याची लिस्ट बनवत आहे.’

एक क्लिकमध्ये बंद करू शकता अकाऊंट

फेसबुकने म्हटले आहे की, ‘परिस्थितीवर नजर ठेवण्यासाठी फेसबुकची एक टीम आहे. फेसबुकच्या टीमने खात लॉक करण्याची सुविधा सुरू केली आहे.’ फेसबुक अधिकारी म्हणाले की, ‘युक्रेनियन वन क्लिक टूलच्या माध्यमातून अकाऊंट बंद करू शकतात.’

रशिया आणि युक्रेनच्या हल्ल्यातील पहिल्याच दिवशी १३७ लोकांचा मृत्यू झाला आहे. याबाबत युक्रेन राष्ट्रपती जेलेंस्की यांनी माहिती दिली आहे. ते म्हणाले की, ‘राजधानी कीवपासून काही दूर असलेल्या चेर्नोबिल न्यूक्लिअर साईटवर आता मास्कोने नियंत्रण घेतले आहे.’ युक्रेनने संयुक्त राष्ट्रांना तातडीने मानवाधिकार परिषदेची बैठक बोलावण्याची विनंती केली आहे.


हेही वाचा – Russia-Ukraine: रशिया-युक्रेन युद्धामुळे मोबाईल फोन, गाड्या, स्टील महागणार


 

First Published on: February 25, 2022 10:19 AM
Exit mobile version