UNSC Resolution On Afghanistan: संयुक्त राष्ट्र परिषदेत अफगाणिस्तानवर ठराव मंजूर, तालिबानविषयी केली महत्त्वाची चर्चा

UNSC Resolution On Afghanistan: संयुक्त राष्ट्र परिषदेत अफगाणिस्तानवर ठराव मंजूर, तालिबानविषयी केली महत्त्वाची चर्चा

UNSC Resolution On Afghanistan: संयुक्त राष्ट्र परिषदेत अफगाणिस्तानवर ठराव मंजूर, तालिबानविषयी केली महत्त्वाची चर्चा

संयुक्त राष्ट्र परिषदेत अफगाणिस्तावर (Afgabistan) ठराव मंजूर करण्यात आला आहे. रशिया  (Russia)आणि चीन (china) या ठरावेळी अनुपस्थित होते. परिषदेत १३ सदस्य देशांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले. UNSC बैठकीत अध्यक्ष पराराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला होते. मिळालेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानचा वापर कोणत्याही देशाला धमकी देण्यासाठी किंवा हल्ला करण्यासाठी किंवा दहशतवाद्यांना आश्रय देण्यासाठी केला जाऊ नये त्याचप्रमाणे दहशतवाद्यांना शिवण्यासाठी किंवा योजना तयार करण्यासाठी त्यांना आर्थिक मदत करण्यासाठी केला जाऊ नये अशी भारताची भूमिका होती. या ठरावातील हा मुख्य प्रस्ताव असल्याचे सांगण्यात येत आहे.

तर अमेरिका, ब्रिटेन आणि फ्रान्सने मांडलेल्या ठरावात अफगाणिस्तानचा भूभाग  कोणत्याही देशाला धमकी देण्यासाठी किंवा ह्ल्ला करण्यासाठी वापरला जाऊ नये अशी मागणी करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, तालिबानने २७ ऑगस्ट रोजी केलेल्या वक्तव्याची या ठरावात प्रामुख्याने नोंद करण्यात आली असून अफगाणिस्तानमधून अफगाण आणि सर्व परदेशी नागरिकांच्या सुरक्षा आणि सुव्यवस्थित निर्वासनासह तालिबानने आपल्या दिलेल्या शब्दाचे पालन करावे अशी सुरक्षा परिषदेशी अपेक्षा असल्याचे सांगण्यात आले.

परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी यावेळी म्हटले की, अफगाणिस्तानवरील आजच्या ठारावामध्ये NISC 1267 दहशवादी आणि घटकांनी रुपरेषा आहे. जी भारतासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगतले. तालिबान अफगाणिस्तानचा वापर कोणत्याही देशाचा धमकावण्यासाठी किंवा हल्ला करण्यासाठी करु शकतो त्यामुळे सावध रहा, असे ते म्हणाले.

UNSC मध्ये अमेरिकेचे प्रतिनिधी म्हणाले की, या ठरावामुळे अफगाणिस्तानच्या भविष्याबद्दल स्पष्ट अपेक्षा करत आहेत. अमेरिकी सैन्य ३१ ऑगस्टला अफगाणिस्तान आणि परदेशी नागरिकांना घेऊन अफगाणिस्तान सोडावा अशी इच्छा तालिबान्यांची आहे. तालिबानच्या वचनबद्दतेचे पालन करावे अशी UNSC ची इच्छा आहे.

 


हेही वाचा – तालिबान्यांकडून हल्ल्यांसाठी केरळवासियांचा वापर, भारताची प्रतिमा मलीन करण्याचा डाव

First Published on: August 31, 2021 9:08 AM
Exit mobile version