घरताज्या घडामोडीतालिबान्यांकडून हल्ल्यांसाठी केरळवासियांचा वापर, भारताची प्रतिमा मलीन करण्याचा डाव

तालिबान्यांकडून हल्ल्यांसाठी केरळवासियांचा वापर, भारताची प्रतिमा मलीन करण्याचा डाव

Subscribe

दहशतवादी हल्ल्यांसाठी तालिबान केरळमधील कट्टरपंथिय नागरिकांचा वापर करत असल्याने भारत सरकारच्या चिंतेत भर पडली आहे.

काबुल विमानतळावर गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १६९ अफगाणि नागरिकांसह १३ अमेरिकन सैनिक ठार झाले. या हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेट ऑफ खुरासन या गटाने स्विकारली तसेच यात भारतीयांचाही समावेश असल्याचा दावा केला होता. हा दावा खरा ठरला असून केरळमधील १४ कट्टरपंथिय नागरिकांचा तालिबानने या हल्ल्यात वापर केल्याचे समोर आले आहे.

दहशतवादी हल्ल्यांसाठी तालिबान केरळमधील कट्टरपंथिय नागरिकांचा वापर करत असल्याने भारत सरकारच्या चिंतेत भर पडली आहे. तालिबानला पाकिस्तानची फूस असल्याचे जगजाहीर आहे. तसेच भारत आणि पाकिस्तानमधील कश्मीर वादही सुरूच आहे. याचाच गैरफायदा घेत पाकिस्तानने तालीबानी संघटनेत केरळमधील कट्टरपंथियाचा समावेश करण्याचे षडयंत्र रचल्याची शक्यता आहे. अफगाणिस्तानला अनेक विकास प्रकल्पात भारताने साथ दिली असल्याने अफगाणिस्तान आणि भारत यांच्यात मैत्रीचे संबंध आहेत. यामुळे अफगाणिस्तानसह इतर मुस्लीम देशांमध्ये भारताबदद्ल आदर आहे. तर दुसरीकडे कश्मीर वादावरून पाकिस्तानने अनेकवेळा अमेरिकेसह मुस्लीम देशांना मध्यस्थी करण्याची विनवणी केली होती. पण त्यात कोणीही स्वारस्य दाखवले नाही. यामुळे आता तालिबानी कार्ड वापरत पाकिस्तानने भारताची प्रतिमा मलिन करण्याचा उद्योग सुरू केला आहे. असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

- Advertisement -

काबुलच्या हल्ल्यात १६९ अफगाणि नागरिक आणि १३ अमेरिकन सैनिकांचा मृत्यू झाला आहे. यामुळे जनमाणसात हल्लेखोर तालिबानींविरोधात रोषाचे वातावरण आहे. त्यातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनीही तालिबान्यांना काबूल हल्ल्याची किंमत मोजावी लागणार अशी धमकी दिली होती. त्यानंतर अमेरिकेने अफगाणमधील दहशतवादी संघटनेच्या तळावर एअर स्ट्राईक केले आहेत. अजूनही हे हल्ले सुरुच आहेत. काबुलसारख्या हल्ल्यांमागील तालिबानी संघटनांमध्ये भारतीयांचाही समावेश झाल्याने भारत अमेरिका तसेच इतर मुस्लीम राष्ट्राबरोबरचे भारताचे संबंधावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हीच चिंता आता भारत सरकारला आहे.

 

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -