अर्थमंत्र्यांच्या ‘या’ शब्दावर अख्खं सभागृह हसू लागलं

अर्थमंत्र्यांच्या ‘या’ शब्दावर अख्खं सभागृह हसू लागलं

Union Budget 2023 : नवी दिल्ली –अर्थसंकल्प सादर होत असताना लोकसभेतील सर्वच सदस्य तो शांतपणे ऐकत असतात. अशा गंभीर वातावरणात अर्थमंत्री निर्मला सितारमन यांच्याकडून अर्थसंकल्प वाचत असताना एक चुक झाली आणि सभागृहात एकच हशा पिकला.

सकाळी ११ वाजता अर्थमंत्री सितारामन यांनी अर्थसंकल्प वाचायला सुरुवात केली. नोकरदार, गुंतवणुकदार, उद्योगपती असे सर्वच जण हा अर्थसंकल्प कान देऊन ऐकत होते. सभागृहात सर्वच लोकप्रतिनिधी गंभीर मुद्रेने अर्थमंत्री सितारामन यांचा प्रत्येक शब्द ऐकत होते. एवढचं काय तर नेहमी आपल्या कवितांनी व मिश्किल भाषणांनी सर्वांना हसवणारे राज्यसभेचे खासदार रामदास आठवले हे शांतपणे अर्थसंकल्प ऐकत होते. त्यामुळे सभागृहातले वातावरण अगदी गंभीर होते. तेवढ्यात अर्थमंत्री सितारामन यांच्याकडून अर्थसंकल्प सादर करताना एक चुक झाली आणि सभागृहात हास्यकल्लोळ झाला.

अर्थसंकल्प वाचत असताना अर्थमंत्री सितारामन आोल्ड पोलुयटेड व्हेहिकल म्हणायचे होते. पण त्या चुकून ओल्ड पॉलिटिकल व्हेहिकल असे म्हणाल्या. बोलण्याच्या ओघात ही चुक झाल्याने सभागृहातील लोकप्रतिनिधींना हसू आवरले नाही. काही लोकप्रतिनिधींना नेमके काय घडले हेच कळले नाही. गंभीर चेहऱ्याने अर्थसंकल्प ऐकणारे रामदास आठवले हसू लागले. मंत्री नितिन गडकरी यांच्याही लक्षात ही चूक आली व ते हसू लागले. नंतर सितारामन यांनाही आपली चुक कळाली. त्यांनी तत्काळ चुक सुधारत आोल्ड पोलुयटेड व्हेहिकल असा उल्लेख करत केला. चुक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद मानत सितारामन यांनी पुढे अर्थसंकल्प वाचायला सुरुवात केली.

जुनी सरकारी वाहने भंगारात काढण्यासाठी करण्यात आलेल्या तरतुदींबाबत अर्थमंत्री सितारामन बोलत होत्या. त्यावेळी त्यांना आोल्ड पोलुयटेड व्हेहिकल असे म्हणायचे होते. पण त्यांनी चुकून ओल्ड पॉलिटिकल व्हेहिकल असा उल्लेख केला. त्यामुळे सभागृहात एकच हशा पिकला व अर्थसंकल्प वाचनामुळे गंभीर झालेले सभागृहातील वातावरण थोड्या वेळासाठी सर्वांच्याच चेहऱ्यावर हसू आणणारे झाले.

First Published on: February 1, 2023 6:58 PM
Exit mobile version