देशातील २४ युनिव्हर्सिटी बनावट, क्रमांक एक उत्तर प्रदेशचा -केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान

देशातील २४ युनिव्हर्सिटी बनावट, क्रमांक एक उत्तर प्रदेशचा -केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान

देशातील २४ युनिव्हर्सिटी बनावट, क्रमांक एक उत्तर प्रदेशचा -केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले आहे की, यूजीसीने देशातील २४ युनिव्हर्सिटी बनावट घोषित केल्या आहेत. यामधील दोन युनिव्हर्सिटीनी नियमांचे उल्लंघन केलं आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी लोकसभेत याबाबत माहिती दिली आहे. विद्यार्थी, पालक, सामान्य जनता आणि इलेक्ट्रॉनिक, प्रिंट मीडियाकडून आलेल्या तक्रांरींच्या आधारे यूजीसीने २४ स्वयं-घोषित युनिव्हर्सिटींना बनावट घोषित केलं आहे.

केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं आहे की, भारतीय शिक्षण परिषद, लखनऊ, युपी आणि भारतीय योजना आणि प्रबंधन संस्थान (IIPM) कुतुब एन्क्लेव, नवी दिल्ली ही संस्थानंही यूजीसी अधिनियम १९५६ चे उल्लंघन करत असल्याचे आढळले आहे. भारतीय शिक्षण परिषदेची प्रकरणं आणि आईआईपीएमची प्रकरण न्यायालयात विचारधीन आहेत.

उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक ८ विद्यापीठे बनावट (Fake University) आहेत. वाराणसीमधील वाराणसी संस्कृत विश्वविद्यालय, महिला ग्राम विद्यापीठ – इलाहाबाद, गांधी हिंदी विद्यापीठ – इलाहाबाद, नेशनल युनिवर्सिटी ऑफ इलेक्ट्रो कॉम्प्लेक्स होम्योपैथी – कानपूर, नेताजी सुभाष चंद्र बोस मुक्त विश्वविद्यालय – अलीगड, उत्तर प्रदेश विश्वविद्यालय – मथुरा, महाराणा प्रताप शिक्षा निकेतन विश्वविद्यालय – प्रतापगढ आणि इंद्रप्रस्थ शिक्षा परिषद – नोएडा या युनिवर्सिटींना बनावट घोषित करण्यात आलं आहे.

दरम्यान यानंतर दिल्लीचा नंबर लागतो, दल्लीत एकूण ७ विद्यापीठे बनावट घोषित करण्यात आली आहेत. कमर्शियल युनिव्हर्सिटी लिमिटेड, युनायटेड नेशन्स युनिव्हर्सिटी, प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, एडीआर-फोकस्ड ज्युडिशियल युनिव्हर्सिटी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड इंजीनियरिंग, सेल्फ-एम्प्लॉयड आणि स्पिरिच्युअल युनिव्हर्सिटीसाठी विश्वकर्मा मुक्त विद्यापीठ असे एकूण सात विद्यापीठांना यूजीसीने बनावट घोषित केलं आहे.

तर ओडीशा आणि पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी दोन विद्यापीठे बनावट आहेत. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अल्टरनेटिव्ह मेडिसिन- कोलकाता, तसेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अल्टरनेटिव्ह मेडिसिन अँड रिसर्च – कोलकाता ही बंगालमधील विद्यापीठे आहेत. तर ओडीशामध्ये नवभारत शिक्षण परिषद – राउरकेला आणि उत्तर ओडीशा कृषी तंत्रज्ञान विद्यापीठ या युनिव्हर्सिटीना बनावट घोषित करण्यात आले आहे.

महाराष्ट्रातल्या एका विद्यापीठाला यूजीसीने बनावट घोषित केले आहे. तसेच कर्नाटक, केरळ, पुद्दुचेरी या राज्यातही प्रत्येकी एक विद्यापीठ बनावट आहे. यामध्ये श्री बोधी उच्च शिक्षण अकादमी -पुद्दुचेरी, तर आंध्रप्रदेशमध्ये राजा अरबी विद्यापीठ, महाराष्ट्रातील नागपूरमध्ये सेंट जॉन्स युनिव्हर्सिटी तर केरळ आणि बडगावी सरकार वर्ल्ड ओपन युनिव्हर्सिटी एज्युकेशन सोसायटी – कर्नाटक या विद्यापीठांना बनावट घोषित करण्यात आले आहे.

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटल आहे की, यूजीसीने राष्ट्रीय हिंदी आणि इंग्रजी मीडियामध्ये बनावट युनिव्हर्सिटीजच्या नावांसह यादी जाहीर करत सूचना दिल्या आहेत. तसेच यूजीसीकडून संबंधित राज्यांच्या मुख्य सचिवांना, शिक्षण सचिवांना आणि मुख्य सचिवांना त्यांच्या अखत्यारिीत असलेल्या विद्यापीठांवर कारवाई करण्यासाठी पत्र पाठवण्यात आले आहे.

First Published on: August 3, 2021 9:57 AM
Exit mobile version