ऑपरेशन गंगाअंतर्गत युक्रेनमधून मुंबईत पोहोचले सातवे विमान, केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा मायदेशी परतणाऱ्यांशी संवाद

ऑपरेशन गंगाअंतर्गत युक्रेनमधून मुंबईत पोहोचले सातवे विमान, केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा मायदेशी परतणाऱ्यांशी संवाद

ऑपरेशन गंगाअंतर्गत युक्रेनमधून मुंबईत पोहोचले सातवे विमान, केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा मायदेशी परतणाऱ्यांशी संवाद

रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असलेल्या युद्ध (Ukraine-Russia War) सुरु आहे. युक्रेनमध्ये हजारो भारतीय नागरिक अडकले आहेत. या भारतीयांना पुन्हा मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारने ऑपरेशन गंगा (Operation Ganga) सुरु करण्यात आले आहे. या ऑपरेशन गंगामध्ये आतापर्यंत हजारो भारतीय विद्यार्थी आणि नागरिकांना भारतात आणण्यात आले आहे. मंगळवारी सकाळी १८२ भारतीयांचे सातवे विमान युक्रेनमधून भारतात दाखल झाले. मायदेशात आल्यानंतर या नागरिकांशी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी संवाद साधत त्यांच्यावर असलेले दडपण दूर केला आहे. तसेच सर्वांचे मुंबई विमानतळावर स्वागत केले आहे. बुकारेस्टहून १८२ भारतीय नागरिकांना घेऊन #AirIndiaExpress IX 1202 विमान मुंबईत दाखल झाले आहे.

भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी एयर इंडियाचे विमान आयएक्स१२०२ ने मुंबईत पोहोचलेल्या १८२ भारतीयांचे स्वागत केले आहे. हे एयर इंडियाचे विशेष विमान आहे. यापूर्वी बुडापेस्टवरुन २४० भारतीय प्रवाशांना घेऊन सहावे विमान भारतात दाखल झाले असल्याची माहिती परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी दिली होती. विमानतळावर प्रवाशांच्या सुविधेसाठी मदतकक्षाची स्थापना करण्यात आली आहे. मोहिमेअंतर्गत भारतीयांना Ukraine मधून मायदेशी आणण्यात येत आहे. आज १८२ विद्यार्थी दाखल झाले. सरकारच्या वतीने मी विद्यार्थ्यांचे स्वागत केले.

विद्यार्थ्यांना घरी पोहचण्यासाठी राज्य सरकारांनी व्यवस्था केली असल्याचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सांगितले. तसेच विद्यार्थी थोडे दडपणाखाली जाणवत होते, त्यांच्याशी बोलून त्यांना धीर दिला. भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी पंतप्रधानांनी 4 मंत्र्यांना युक्रेनच्या शेजारी राष्ट्रांचे विशेष दूत म्हणून पाठवले असल्याचे नारायण राणे म्हणाले. भारतीय दुतावासाच्या संपर्काने आम्ही सीमेवर पोहोचलो, तेथून आम्हाला विशेष विमानाने मायदेशी आणण्यात आले. मायदेशी परतल्याचा आनंद असल्याच्या भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या आहेत.

केंद्रातील ४ मंत्री युक्रेनच्या शेजारी देशात जाणार

केंद्र सरकारच्या ऑपरेशन गंगा अंतर्गत आतापर्यंत ११०० पेक्षा अधिक भारतीय नागरिकांना पुन्हा परत आणले आहे. तसेच आणखी भारतीयांना आणण्यासाठी केंद्र सरकारमधील ४ मंत्री युक्रेनच्या शेजारी देशात जाणार आहेत. यामध्ये केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, किरेन रिजिजू व्हीके सिंग आणि हरदीप सिंग पुरी यांना पाठवण्यात येणार आहे. ज्योतिरादित्य सिंधिया रोमानिया आणि मोल्दोव्हाला, किरेन रिजिजू स्लोव्हाकियाला, हरदीप सिंग पुरी हंगेरीला आणि जनरल (आर) व्हीके सिंग पोलंडला जाणार आहेत. केंद्रीय मंत्री बाजूच्या देशातून युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना आणण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.


हेही वाचा : Russia-Ukraine War : अमेरिकेच्या निर्बंधांवर पुतिन यांचा पलटवार, अमेरिका अन् मित्र राष्ट्रांवर केली कारवाई

First Published on: March 1, 2022 9:57 AM
Exit mobile version