घरदेश-विदेशRussia-Ukraine War : अमेरिकेच्या निर्बंधांवर पुतिन यांचा पलटवार, अमेरिका अन् मित्र राष्ट्रांवर...

Russia-Ukraine War : अमेरिकेच्या निर्बंधांवर पुतिन यांचा पलटवार, अमेरिका अन् मित्र राष्ट्रांवर केली कारवाई

Subscribe

रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे परिस्थिती झपाट्याने बदलत आहे. दरम्यान रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सोमवारी अमेरिका आणि त्याच्या मित्र राष्ट्रांवर कारवाई करत विशेष आर्थिक निर्बंधांचे आदेश दिले आहेत. क्रेमलिन प्रेस सर्व्हिसचा हलावा देत पुतिन यांनी अमेरिका आणि त्याच्याशी संबंधित देशांविरुद्ध कारवाई केली आहे.

क्रेमलिन प्रेस सर्व्हिसने, डिक्रीचा हवाला देत म्हटले आहे की, 1 जानेवारी 2022 पासून निर्यातदारांना क्रेडिट केलेल्या परकीय चलनाच्या कमाईपैकी 80 टक्के रक्कम अनिवार्यपणे खर्च करावी लागेल आणि ती अधिकृत बँकांमध्ये जमा करावी लागेल. तीन दिवसांच्या कामकाजाच्या दिवसांत अधिकृत बँकांतील खात्यांमध्ये ही रक्कम जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त OFAC ने रशियन थेट गुंतवणूक निधीवरही प्रतिबंधात्मक निर्बंध लादले आहेत.

- Advertisement -

यापूर्वी युक्रेनमध्ये रशियाच्या लष्करी कारवाईमुळे पाश्चात्य देशांनी मॉस्कोवर नवे निर्बंध लादले होते. अमेरिकेचे राज्य सचिव अँटनी ब्लिंकन यांनी एका प्रेस स्टेटमेंटमध्ये म्हटले आहे की, कोणत्याही अमेरिकन व्यक्तीला रशियन फेडरेशनची सेंट्रल बँक, रशियन फेडरेशनचा नॅशनल वेल्थ फंड किंवा रशियन फेडरेशनच्या वित्त मंत्रालयाशी कोणतेही व्यवहार करण्यावर बंदी घातली आहे. अमेरिकेची कारवाई रशियन सेंट्रल बँकेसह अमेरिकन डॉलर व्यवहार पूर्णपणे प्रतिबंधित करेल आणि रशियन थेट गुंतवणूक निधी पूर्णपणे गोठवेल.

परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन यांनी सोमवारी एका निवेदनात म्हटले की, मिन्स्कमधील दूतावासातील कामकाज स्थगित करण्याची आणि मॉस्कोमधून दूतावासातील कर्मचार्‍यांच्या प्रस्थानाची घोषणा केली . “युक्रेनमध्ये रशियन लष्करी दलांनी केलेल्या अनावश्यक हल्ल्यामुळे उद्भवलेल्या सुरक्षेच्या समस्यांमुळे आम्ही ही पावले उचलली आहेत,” असंही ते म्हणाले.

- Advertisement -

रशियातून येणाऱ्या पदार्थांवर युक्रेनमध्ये बंदी

एका वृत्तासंस्थेच्यावृत्तानुसार, पेनसिल्व्हेनियाचे गव्हर्नर टॉम वुल्फ यांनी रविवारी पेनसिल्व्हेनिया लिकर कंट्रोल बोर्डाला रशियनतून पुरवलेली उत्पादने स्टोअरमधून काढून टाकण्यास सांगितले आहे. मंडळाने अशा दुकानांची आधीच ओळख करून रशियातून येणारे पदार्थ विक्री करू नये, असे आवाहनही केले. मंडळाने नंतर आपल्या उत्तरात सांगितले की, युक्रेनच्या लोकांमधील एकता दाखवण्यासाठी आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी रशियननिर्मित उत्पादने दुकाने आणि शेल्फमधून काढून टाकली जातील.


Aircraft Fuel Price : विमान प्रवास महागणार, हवाई इंधन दरात ३.२ टक्क्यांची वाढ


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -