CoronaVirus: अमेरिकेत कोरोनाचा कहर; २४ तासांत २३३५ जणांचा मृत्यू

गोव्यात कोरोनाची चिंता वाढली; कोरोनाचा चौथा बळी!

सर्वत्र कोरोनाचा संसर्ग वाढत चालला असून त्यामुळे अमेरिकेत सर्वाधिक कोरोना रुग्ण असल्याचे पाहायला मिळत आहे. अमेरिकेतील कोरोनाबाधितांची संख्या काही कमी होताना दिसत नाही. शिवाय येथील मृत्यूचा आकडाही जास्त आहे. गेल्या २४ तासांत अमेरिकेत २ हजार ३३५ जणांना कोरोना आजारामुळे जीव गमवावा लागला आहे. अमेरिकेसाठी ही धक्कादायक बाब आहे. यापूर्वीही अमेरिकेत एका दिवसात १ हजार ३०० जणांच्या मृत्युची नोंद झाली आहे. मात्र आताचा हा आकडा खुपच जास्त आहे. संपूर्ण जगातील मिळून एक चतुर्थांश कोरोना रुग्ण हे एकट्या अमेरिकेत आहेत. आतापर्यंत १२ लाख लोकांहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. न्यूयॉर्क, न्यूजर्सी, कॅलिफॉर्नियामध्ये सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.

हेही वाचा – नोएडातील मुलाने बनवला होता ‘बॉइज लॉकर रुम’ ग्रुप

या शहरांमध्ये सर्वाधिक रूग्ण 

वर्ल्डोमीटरने दिलेल्या आकडेवारीनुसार अमेरिकेत कोरोनाबाधितांची संख्या बुधवार सकाळपर्यंत १२ लाख ३७ हजार ६३३ इतकी झाली आहे. तर एकूण ७२ हजार २७१ जणांचा त्यामुळे मृत्यू झाला आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात सर्वाधिक म्हणजेच ३ लाख ३० हजार १३९ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर २५ हजार २०४ जण मृत्यूमुखी पडले आहेत. त्यानंतर न्यूजर्सीमध्ये १ लाख ३१ हजार ७०५ कोरोना रुग्णांपैकी ८ हजार २९२ लोकांचा या आजारामुळे मृत्यू येथे झाला आहे. त्याशिवाय मॅसाचुसेट्स आणि इलिनॉयसमध्येही कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव झाल्याचे समजते.

First Published on: May 6, 2020 10:29 AM
Exit mobile version