घरताज्या घडामोडीनोएडातील मुलाने बनवला होता 'बॉइज लॉकर रुम' ग्रुप

नोएडातील मुलाने बनवला होता ‘बॉइज लॉकर रुम’ ग्रुप

Subscribe

इन्स्टाग्रामवरील 'बॉइज लॉकर रूम' ग्रुपवर झालेल्या अश्लील चॅट व्हायरल झाल्यानंतर खळबळ माजली होती. या ग्रुपवर काही शालेय विद्यार्थी अश्लील चॅट करत होते. या ग्रुपमध्ये मुलींचे फोटो टाकून सामूहिक बलात्कार करण्याची चर्चा सुरू होती.

इन्स्टाग्रामवरील ‘बॉइज लॉकर रूम’ ग्रुपवर झालेल्या अश्लील चॅट प्रकरणातील एक नवीन बाब समोर आली आहे. नोएडा येथील एका मुलाने हा ग्रुप तयार केला होता. हा मुलगा प्रौढ आहे आणि त्याने या ग्रुपमध्ये त्याचे मित्र जोडले. या मुलाने दुसर्‍या मुलाला ग्रुप अॅडमीन बनवलं. ही मुलं त्यांच्याबरोबर शिकणाऱ्या मुलींचे फोटो ग्रुपमध्ये शेअर करत असत. पोलिसांनी ग्रुपमधील प्रौढ सदस्यांना चौकशीसाठी बोलावलं तेव्हा ते आले नाहीत. मंगळवारी सायबर सेलच्या पथकाने त्यांच्या घरातून पाच जणांना ताब्यात घेतलं.

दरम्यान, पुरावे सापडल्यानंतर आरोपीला लवकरच अटक केली जाईल, असं सायबर सेल पोलिस अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. या मुलांकडे मुलींचे अश्लील फोटो के आले याचा तपास केला जात आहे. ग्रुपमध्ये ज्या मुलीचा फोटो शएअर करण्यात आला, त्या मुलीला ग्रुपमधील एकाने सांगितलं. या मुलाने ग्रुपमधील चॅटचे स्क्रिनशॉट्स त्या मुलीला पाठवले. त्याने ग्रुपमध्ये गप्पा मारल्या नाहीत, असा दावा या मुलाने केला आहे. त्याने हा ग्रुप बऱ्याच दिवसांनंतर पाहिला आणि त्याला कळालं. ग्रुपमध्ये केवळ आठ ते नऊ मुलच कार्यरत होती. या मुलीने इतर मुलींना याबाबत सांगितलं. मुलींनी ट्विटरवर सर्व फोटो शेअर केले. त्यानंतर या मुलांनी हा ग्रुप डिलीट केला.

- Advertisement -

हेही वाचा – आरोग्य सेतू अ‍ॅपमध्ये त्रुटी, ९ कोटी वापरकर्त्यांची गोपनीयता धोक्यात; फ्रेंच हॅकरचा दावा

 

- Advertisement -

हिंदुस्थानी भाऊंनी या घटनेवर ट्विट करून या मुलांचा शोध घेऊन त्यांना पोलिसांच्या स्वाधीन करा असं म्हटलं होतं. इंडियन रॅपर रफ्तारने ट्वीट केलं की, “आता हे प्रकरणावर चर्चा करु नका, पोलिस हे सर्व हाताळतील.” दरम्यान, या मुलांनी नवीन ग्रुप तयार केला आहे आणि स्क्रीनशॉट लीक करणार्‍या मुलाला धमकावलं आहे. सर्वच मिळून मुलींवर बलात्कार करण्याची धमकी दिली आहे.

ग्रुपच्या सुरूवातीस सोशल मीडियावर व्हायरल झालेले स्क्रीन शॉट्स बरोबर होते. आता सोशल मीडियावर खोटे स्क्रीनशॉट्स व्हायरल होत आहेत. आता सोशल मीडियात मुलींविरूद्ध उलट लिहिलं जात आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -