उन्नाव बलात्कार प्रकरण: पीडिता आणि तिच्या कुटुंबियांवरच तक्रार दाखल

उन्नाव बलात्कार प्रकरण: पीडिता आणि तिच्या कुटुंबियांवरच तक्रार दाखल

उन्नाव बलात्कार प्रकरण

उत्तर प्रदेशच्या उन्नाव बलात्कार प्रकरणाला नवे वळण आले आहे. पोलिसांनी या प्रकरणात पीडितांवरचं फसवणुक केल्याची एफआयआर दाखल करण्यात आली आहे. पीडितेची आई आणि काका यांच्यावर कागदपत्रांची छेडछाड केली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. पीडितेच्या आई आणि काकांवर असा आरोप करण्यात आला आहे की, पीडित मुलगी अल्पवयिन असल्याचे दाखवण्यासाठी त्यांनी कागदपत्रांची छेडछाड केली. याप्रकरणात पीडितेने भाजप आमदार कुलदीर सिंह सेंगरवर बलात्कार केल्याचा आरोप केला होता. स्थानिक कोर्टाने दिलेल्या आदेशावरुन पीडित आणि तिच्या कुटुंबियांच्याविरोधात रविवारी पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणात आरोपकर्ते हरिपाल सिंह आहेत. ज्यांची पत्नी शशि आणि मुलगा शुभमवर देखील बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे.

काय आहेत आरोप

एसएचओ दिनेश मिश्रा यांनी असे म्हटले आहे की, या प्रकरणात हरिपाल यांनी आरोप केला आहे की, पीडितेची आई आणि काकाने पीडितेच्या शाळेच्या मुख्याध्यापकांची खोटी स्वाक्षरी आणि स्टँप लावू खोटे स्कूल ट्रान्सफर सर्टिफिकेट तयार केले.कोर्टात दिलेले एफिडेविटमध्ये हरिपाल सिंहने आरोप केला आहे की, सेंगरवर गँगरेपचा आरोप करणाऱ्या पीडितेचे अवद्वस तिवारी नावाच्या एका व्यक्तीसोबत संबंध होते आणि मागच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात ती या व्यक्तीसोबत पळून गेली होती. त्यानंतरर ती परत आली तेव्हा तिच्या कुटुंबियांनी तिच्यावर शुभमसोबत लग्न करण्याचा दबाव टाकला. हरिपाल सिंहने आरोप केला आहे की, पीडितेच्या कुटुंबियांनी लग्नाची जबरदस्ती करुन माझ्या मुलाला आणि पत्नीला खोट्या प्रकरणात फसवले.

काय आहे प्रकरण

जून २०१७ मध्ये पीडितेने आरोप केला होता की, जेव्हा कुलदीप सिंह सेंगरकडे नोकरीसाठी भेटायला गेली होती तेव्हा त्यांना बलात्कार केला होता. याप्रकरणाला हिंसक वळण तेव्हा आले जेव्हा पीडितेने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या घराबाहेर आत्महत्येचा प्रयत्न केला. तेव्हा तिने आरोप केला होता की, महिनाभरापूर्वी तक्रार करुन देखील पोलिसांनी आरोपींवर काहीच कारवाई केली नाही. याप्रकरणी जेव्हा आंदोलनाला सुरुवात झाली तेव्हा हे प्रकरण सीबीआयच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर सेंगरला अटक करण्यात आली. तेव्हा ३ एप्रिलला अशी माहिती समोर आली की, सेंगरचा भाऊ आणि त्याच्या काही मित्रांनी पीडितेच्या वडिलांना बेदम मारहाण केली. त्यानंतर तिच्या वडिलांना आर्म्स अॅक्ट आणि काही अन्या आरोपांवरुन जेलमध्ये पाठवण्यात आले. त्यानंतर ८ एप्रिलला त्यांची प्रकृतीत बिघाड झाला आणि जेलमध्येच त्यांचा मृत्यू झाला.

First Published on: December 27, 2018 4:48 PM
Exit mobile version