LIVE: कोरोनाविरोधातील लढाईला आपण जनआंदोलन बनवले – पंतप्रधान नरेंद्र मोदी

LIVE: कोरोनाविरोधातील लढाईला आपण जनआंदोलन बनवले – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra modi) संयुक्त राष्ट्र संघाच्या आर्थिक व सामाजिक परिषदेला संबोधित करत आहेत. युनोच्या सुरक्षा परिषदेत भारताची निवड झाल्यानंतर पंतप्रधान मोदी प्रथमच आंतरराष्ट्रीय परिषदेला संबोधित करत आहेत. यावेळी त्यांनी कोरोना (covid 19) विरोधातील लढाईला आपण सर्व भारतीय नागरिकांनी मिळून जनआंदोलन बनवले असल्याचे म्हटले आहे. पंतप्रधानांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला असून सुरूवातीलाच पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, बहुभाषिकतेसमोर आज अनेक आव्हान उभी आहेत. जर भारत विकासाची उद्दिष्टे साध्य करण्यात यशस्वी झाला, तर जागतिक उद्दिष्टांही पुढे जातील. म्हणून आम्ही आपल्या लोकांना शिक्षित करुन संपूर्ण समाजाचा दृष्टीकोण स्वीकारला आहे.

काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी

२०३० पर्यंतचा निश्चित केलेले उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी भारत पूर्णपणे प्रयत्न करत आहे. आम्ही विकसित देशांची मदत करत आहोत. आमचे उद्दिष्टच सबका साथ, सबका विकास और सबका विश्वास आहे. कोरोना आणि लॉकडाउनमुळे संकटात आलेल्या अर्थव्यवस्थेला पुन्हा रुळावर आणण्यासाठी आम्ही पॅकेज जाहीर केले. तसेच आत्मनिर्भर भारत अभियानही सुरू केले आहे. सरकारने सर्वच नैसर्गिक आपत्तींना तोंड दिले आहे. कोविडसाठी भारताने निधी उभारला. भारताने गरिबांसाठी घरे बनवली. गरिबांना उपचारासाठी आयुष्यमान भारत योजना चालवली. मागील पाच वर्षात भारताने ३८ मिलियन कार्बन उत्सर्जन कमी केले आहे. त्याचबरोबर सिंगल यूज प्लास्टिकसाठी अभियान हाती घेतले आहे.

हेही वाचा –

भानुशाली इमारत दुर्घटनेत १० जणांचे बळी; एकाची प्रकृती चिंताजनक

First Published on: July 17, 2020 8:43 PM
Exit mobile version