घरमुंबईभानुशाली इमारत दुर्घटनेत १० जणांचे बळी; एकाची प्रकृती चिंताजनक

भानुशाली इमारत दुर्घटनेत १० जणांचे बळी; एकाची प्रकृती चिंताजनक

Subscribe

फोर्ट येथील भानुशाली इमारतीच्या दुर्घटनेतील (Fort building collapse) मृतांची संख्या १० वर पोहोचली आहे. काल रात्रीपर्यंत २ जणांचे मृत्यू झाले होते. पण जे. जे. रुग्णालयात (j j hospital) उपचार सुरू असलेल्या आणखी ७ जणांचे मृत्यू शुक्रवारी झाले. रात्री मध्यरात्रीपर्यंत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या व्यक्तीचा शोध घेण्यात आला. दरम्यान, या इमारतीचे भराव काळजीपूर्वक बाजूला करण्यात येत आहे. यानंतर शेजारच्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करून ती इमारत धोकादायक असल्यास ती इमारतही पाडली जाईल अशी माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

फोर्ट (Fort) येथील जीपीओ (GPO) समोरील मिंट रोडवर असलेल्या पाच मजली भानुशाली इमारतीचा काही भाग गुरुवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास कोसळला. यामध्ये प्रारंभी दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. तर दोन जण जखमी झाले होते. यातील एक किरकोळ तर दुसऱ्याची तब्येत चिंताजनक होती. त्यानंतर सुरू असलेल्या मोहिमत मुंबई अग्निशमन दलाच्या जवान आणि अधिकाऱ्यांनी इमारतीच्या एका भागात अडकलेल्या  एकूण २३ जणांना सुरक्षित बाहेर काढले. याशिवाय कॅमेरा व इतर यंत्रणांच्या मदतीने ढिगाऱ्याखाली लोकांचा शोध घेत त्यांना बाहेर काढले. त्यांना त्वरित जे. जे. रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर सुरू असलेल्या सर्च मोहिमेत उशिरापर्यंत पाच जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. मृत पावलेले हे सर्व लोक अगदी तळाच्या बाजूला अडकल्याने त्यांना बाहेर काढण्यात अडचणी येत होत्या. मात्र एका बाजूला भरावमध्ये अडकलेल्या लोकांचा शोध असू असताना, दुसरीकडे अर्धवट भागात अडकलेल्या लोकांचाही शोध सुरू होता. रात्री नऊ वाजता एका व्यक्तीला सुरक्षित बाहेर काढण्यात आले होते.

- Advertisement -

ही इमारत म्हाडाची (Mhada) उपकर प्राप्त इमारत होती. या इमारतीचा काही भागाची माती पडू लागल्याने रहिवाशांनी इमारतीच्या खाली धाव घेतली. त्यातील अर्धे लोक खाली उतरले आणि अर्धे लोक उतरत असताना जिन्याकडीलच भाग कोसळल्याने  ढिगाऱ्याखाली काही अडकले गेले. त्यामुळे अर्ध्या लोकांचे जीव वाचले. तर काही लोक तळाशी पोहोचल्यावर इमारतीचा भाग कोसळल्याने ते ढिगाऱ्याच्या अगदी तळाशी जाऊन अडकले. त्यामुळे त्यांना वाचवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले नाही. जखमी झालेल्या १२ लोकांना जे. जे. रुग्णालयात दाखल केले होते. त्यातील १० जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती महापालिका आपत्कालीन नियंत्रण कक्षाने दिली आहे.

या इमारतीच्या शेजारच्या इमारतीलाही धोका निर्माण  झाला आहे. मात्र, या इमारतीतील सर्व नागरिक नातेवाईकांकडे गेले असून या शेजारच्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार आहे. तत्पुर्वी भानुशाली इमारतींचा भराव दूर करणे आवश्यक असून अग्निशमन दलाच्या जवानांनी हा भराव दूर केल्यानंतर याचे ऑडिट करण्यात येईल. यामध्ये जर ही इमारत धोकादायक असेल तर ती पाडण्यात येईल, असे ए विभागाच्या सहायक आयुक्त चंदा जाधव यांनी स्पष्ट केले. पण ऑडिटनंतर याठिकाणी रहिवाश्यांना राहायला द्यायचे की पडायचे हा निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

इमारत दुर्घटनेनंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री अस्लम शेख, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, आमदार आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, म्हाडाच्या इमारत दुरुस्ती मंडळाचे अध्यक्ष विनोद घोसाळकर, ए विभागाच्या सहायक आयुक्त चंदा जाधव, नगरसेविका सुजाता सानप, माजी नगरसेवक गणेश सानप, मनसेचे विभाग अध्यक्ष अरविंद गावडे आदींनी भेट दिली

मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ४ लाख रुपये

भानुशाली इमारत दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना ४ लाख आणि जखमींना ५० हजार रुपयांची मदत करण्याची घोषणा मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी शुक्रवारी केली. तसेच इमारतीचे काम पूर्ण होईपर्यंत गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याशी चर्चा करून रहिवाशांची निवाऱ्याची व्यवस्था सरकारच्यावतीने करण्याची ग्वाही शेख यांनी दिली आहे. या दुर्घटनेबाबत माहिती मिळताच मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी घटनास्थळी धाव घेऊन दुर्घटनाग्रस्तांना संपूर्ण मदत करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनास केल्या. दुर्घटनाग्रस्तांना चांगल्या दर्जाचे उपचार देण्यात यावेत. तसेच त्यांच्यासाठी तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था करण्यात यावी, अशा सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या. मुख्यमंत्री सहायता निधीमधून मृतांच्या कुटुंबियांना अतिरिक्त मदत मिळण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याबाबत जिल्हा प्रशासनास सूचना देण्यात आल्या आहेत.

मृतांची नावे –

१) जोत्स्ना पद्मालाल गुप्ता (५०)
२) कुसुम पद्मालाल गुप्ता (४५)
३) पद्मालाल गुप्ता (५०)
४) अनोळखी (५०)
५) किरण धीरज मिश्रा(३५)
६) माणिबेन नानजी फारीया(६२)
७) शैलेश भालचंद्र कांडू (१७)
८)  प्रदीप चौरसिय(३५)
९) रिंकू चौरसिया (२५)
१०) कल्पेश नाझी तारीया (३२)

जखमींची नावे –

१) नेहा गुप्ता (२५) – प्रकृती चिंताजनक
२) भालचंद्र कांडू (४५) – किरकोळ दुखापत

फोर्ट येथील जीपीओ कार्यालया समोरील भानुदास इमारत दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली अनेक रहिवाशी अडकले होते. ढिगाऱ्याखाली अडकलेल्याना शोधून बाहेर काढण्याचे काम मुंबई अग्निशमन दल, एनडीआरएफ च्या जवानांसह आणखी एक करत होता. तो म्हणजे एनडीआरएफ श्वान. या श्वानाच्या मदतीने अडकलेल्या अनेकांना बाहेर काढण्यात आले. दुर्दैवाने या दुर्घटनेत १० जणांचा मृत्यू झाला आहे. अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या जवानांच्या बरोबरीने काम करणाऱ्या श्वानाला बघून अनेकांना त्याचे कौतुक वाटत होते.

हेही वाचा –

कोरोना रुग्णांसाठी जितेंद्र आव्हाड करणार ‘प्लाझ्मा दान’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -