UP Assembly Elections Result 2022 : उत्तर प्रदेशमधील भाजपच्या विजयाची ‘ही’ आहेत पाच कारणे

UP Assembly Elections Result 2022 : उत्तर प्रदेशमधील भाजपच्या विजयाची ‘ही’ आहेत पाच कारणे

UP Assembly Elections Result 2022 : युपीमधील भाजपच्या विजयाची 'ही' आहेत पाच कारणे

योगी सरकारने पुन्हा एकदा उत्तरप्रदेशमध्ये पूर्ण बहुमताने विजय मिळवला आहे. मतमोजणी सुरु झाल्यापासून उत्तरप्रदेशमध्ये भाजप आघाडीवर असल्याचे दिसेल. तर संध्याकाळपर्यंत भाजपने स्पष्ट बहुमत मिळवल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे भाजप कार्यालयात मोठा जल्लोष सुरु झाला. ढोल- ताशांतच्या गजरात कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी गुलालाची उधळण करत होळी साजरी केली, तर भाजप कार्यालय परिसर देखील गुलालाने रंगला होता.

उत्तरप्रदेशमध्ये भाजप मित्रपक्षांसह 273 जागांवर आघाडीवर होता. तर सपा आघाडी 125 जागांवर आघाडीवर आहे. 41 जागांवर 2 हजार मतांच्या फरकाने विजय मिळाला. तर सपा 211 जागांवर दुसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे, पश्चिम उत्तर प्रदेशातील 136 जागांपैकी भाजप 84, सपा 42 आणि आरएलडी 10 जागांवर आघाडीवर आहे.

जनतेमध्ये विश्वास निर्माण करा

उत्तरप्रदेश निवडणुक प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना पटवून दिले की, योगी सरकारने प्रत्येक घटकासाठी काम केले आहे आणि मागील सरकारपेक्षा चांगले काम केले आहे. तसेच महिला सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी योगी सरकारमध्ये महिलांना पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित असल्याचा विश्वास निर्माण करून देण्यात यश मिळवले.

उत्तरप्रदेशमध्ये भाजप निवडून येण्याची पाच कारणे

1) लाभार्थी मतदारांचा लाभ

भाजपचे उत्तरप्रदेशातील पुनरागमन करण्याचे सर्वात मोठे कारण लाभार्थी योजना महत्त्वाची ठरले असे म्हटले जाते. त्यामुळे निवडणुकीत लाभार्थी वर्गाला आकर्षित करण्याचा भाजपचा डाव यशस्वी झाला. PM आवास योजना, PM उज्ज्वला योजना, जन-धन खाते, PM किसान सन्मान निधी योजना, मुद्रा कर्ज, PM जीवन-सुरक्षा योजना यांसारख्या योजनांचा लाभ सर्वसामान्यांना मिळाला. त्यामुळे महिलांनी भाजपला भरभरून मतदान केले.

2) राम मंदिर आणि विश्वनाथ कॉरिडॉर

राम मंदिर हा भाजपचा निवडणुकीत एक प्रमुख मुद्दा होता. अयोध्येतील राम मंदिराचे बांधकाम आणि वाराणसीतील विश्वनाथ मंदिर कॉरिडॉरचे बांधकाम पूर्वांचलमध्ये भाजपसाठी गेम चेंजर्स ठरले. हे दोन्ही भावनिक मुद्दे आहेत. ज्याचा पक्षाला फायदा झाला. विश्वनाथ कॉरिडॉरच्या उद्घाटनावेळी मोदी म्हणाले होते की, ते देशाला “निर्णायक दिशा” देईल. आणि ते खरोखरच निर्णायक ठरले असे म्हटले जाते.

3) कृषी कायदा मागे घेण्याची घोषणा

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये अचानक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वादग्रस्त कृषी कायदा मागे घेण्याची घोषणा केली. निवडणुकीच्या अवघ्या काही महिन्यांपूर्वी घेतलेला मोदी सरकारचा हा निर्णय भाजपच्या विजयासाठी महत्त्वाचा ठरला. शेतकरी सर्वाधिक नाराज असलेल्या पश्चिम यूपीमध्येही भाजपला चांगल्या जागा मिळाल्या.

4) कायदा आणि सुव्यवस्था चांगली
मुख्यमंत्री योगी यांनी आपले सरकार स्थापन करताच यूपीतील सर्व गुन्हेगारांना तुरुंगात टाकून कायदा आणि सुव्यवस्थेबाबत कडकपणा दाखवला. सर्व गुन्हेगारांना राज्य सोडून पळून जावे लागले. गुन्हेगारांचे तात्काळ एन्काउंटर झाल्या करण्यात आले. यामुळे राज्यात कायदा सुवस्था निर्माण होण्यास मदत झाली आणि निवडणुकीतही भाजपला याचा फायदा झाला.

5) योगी आदित्यनाथ यांचा चेहरा
मुख्यमंत्री म्हणून योगी आदित्यनाथ यांचा चेहरा त्यांच्या कार्यकाळात निष्कलंक राहिला. खुद्द नरेंद्र मोदींनी योगी आदित्यनाथ यांच्यावर विश्वास व्यक्त केला. निवडणूक सभांमध्ये योगींचे कौतुक केले. याचा फायदा पक्षाला झाला.


भाजपचाच झंझावात! उत्तर प्रदेश – गोव्यात पुन्हा भाजप, पंजाबमध्ये आपची सत्ता


First Published on: March 11, 2022 8:07 AM
Exit mobile version