UP Election 2022 : यूपीत भाजपकडून ताकद पणाला; बरेलीत आज पीएम मोदी, गृहमंत्री अन् सीएमची रॅली

UP Election 2022 : यूपीत भाजपकडून ताकद पणाला; बरेलीत आज पीएम मोदी, गृहमंत्री अन् सीएमची रॅली

उत्तरप्रदेश विधानसभेत एक हाती सत्ता मिळवण्यासाठी भाजप शुक्रवारी बरेलीमध्ये पूर्ण ताकद पणाला लावणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी 12 वाजेपर्यंत व्हर्च्युअल रॅली काढणार आहे. तर सायंकाळी 5 ते 7 या वेळेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ टिळक इंटर कॉलेज ते सिव्हिल लाइन्समधील पक्ष कार्यालयापर्यंत रोड शो करणार आहेत. याशिवाय गृहमंत्री अमित शाह आज बरेलीमध्ये दाखल होत दुपारी १२ वाजता ते भोजीपुरा नंतर आमला येथे सभेला संबोधित करतील.

पंतप्रधान 11 फेब्रुवारीला बरेलीमध्ये रॅली घेणार असल्याचं सांगण्यात येत होतं, मात्र पावसामुळे ही रॅली रद्द करण्यात आली. मात्र पंतप्रधान आज दुपारी 12 ते 1.30 या वेळेत आभासी रॅलीला संबोधित करतील. या रॅलीच्या तयारीसाठी उत्तर प्रदेश निवडणूक प्रभारींनी बुधवारी सर्व विधानसभा मतदारसंघ प्रभारींची बैठक घेतली.

गृहमंत्री अमित शाह सकाळी 11.30 वाजता त्रिशूल विमानतळावर पोहोचतील आणि तेथून भोजीपुरा येथे रवाना होतील, 12 वाजता ते नैनिताल रोड टोल प्लाझासमोर जाहीर सभेला संबोधित करतील. यानंतर शाह येथून अमलाकडे रवाना होतील आणि सकाळी 1.50 वाजता सुभाष इंटर कॉलेज मैदानावर सभेला संबोधित करतील. येथून साडेतीन वाजता ते शहाजहानपूर येथील सभेला संबोधित करण्यासाठी रवाना होतील.

संध्याकाळी ५ ते ७ या वेळेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ टिळक इंटर कॉलेज ते सिव्हिल लाईन्स पार्टी ऑफिस असा रोड शो करणार आहेत. नगर अध्यक्ष केएम अरोरा यांनी सांगितले की, रोड शोचा कार्यक्रम निश्चित झाला आहे. मात्र, अद्याप मार्ग निश्चित करण्यात आलेला नाही. 9 फेब्रुवारीला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची बहेरी आणि नवाबगंजमध्ये रॅली होणार होती, मात्र पावसामुळे दोन्ही रॅली रद्द करण्यात आल्या. यानंतर त्यांनी बहेडी येथे व्हर्च्युअल रॅली केली.


Ukraine Crisis : अमेरिकन नागरिकांनो तातडीनं युक्रेन सोडा; रशियाकडून हल्ल्याच्या भीतीनं बायडेन सरकारचा इशारा


First Published on: February 11, 2022 9:54 AM
Exit mobile version