UP Election 2022 : उन्नाव बलात्कार पीडितेच्या आईला उमेदवारी, काँग्रेसकडून १२५ उमेदवारांमध्ये ५० महिलांना संधी

UP Election 2022 : उन्नाव बलात्कार पीडितेच्या आईला उमेदवारी, काँग्रेसकडून १२५ उमेदवारांमध्ये ५० महिलांना संधी

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसकडून महिलांना प्राधान्य देण्यात आले आहेत. काँग्रेसच्या सचिव प्रियंका गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये एकूण १२५ जणांना उमेदवारी दिली असून ५० महिलांना देखील संधी देण्यात आली आहे. उन्नावमधील बलात्कार पीडित तरुणीच्या आईलाही काँग्रेसकडून तिकीट देण्यात आले आहे. काँग्रेसनं उत्तर प्रदेशमध्ये वेगळी रणनिती अवलंबली असून याचा किती फायदा होणार हे येणाऱ्या निवडणुकीनंतरच स्पष्ट होईल.

काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन उमेदवारी जाहीर केली आहे. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीसाठी उण्णाव बलात्कार पीडितेच्या आईला काँग्रेसनं उमेदवारी दिली आहे. प्रियंका गांधींनी सांगितले की, उमेदवारांमध्ये महिलांसोबत, पत्रकार, अभिनेत्री आणि समाजसेवा करणाऱ्यांचा समावेश आहे.

बड्या नावांपैकी सलमान खुर्शीद यांची पत्नी लुईस खुर्शीद यांना तिकीट देण्यात आले आहे. तसेच उन्नावमधून काँग्रेसने आशा सिंह यांना उमेदवारी दिली आहे. एआरसी आणि सीएएविरोधात आंदोलन करणाऱ्या सदफ जाफरलासुद्धा उमेदवारी दिली आहे. आशा वर्कर असलेल्या पूनम पांडेंनाही पक्षाकडून तिकीट देण्यात आले आहे.

बलात्कार पीडितेच्या आईला लढा सुरु ठेवता येईल

काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी म्हणाल्या की, उण्णावमधील उमेदवार बलात्कार पीडितेची आई आहे. त्यांना त्यांची न्याय मिळवण्याबाबतचा संघर्ष सुरु ठेवण्याची संधी देण्यात आली आहे. ज्या सत्तेमुळे त्यांच्या मुलीवर अत्याचार झाला, कुटुंबाला बदनाम करण्यात आले आहे. तीच सत्ता त्यांना मिळाली पाहिजे असे प्रियंका गांधी म्हणाल्या आहेत. कोरोना काळात दिवस रात्र सेवा देऊनसुद्धा आशा वर्कर्सना मारण्यात आले. त्यांना मानसिक त्रास देण्यात आला. तसेच सीएए एनआरसीच्या वेळी संघर्ष करणाऱ्यांना त्रास देण्यात आला त्यांनाही उमेदवारी दिली आहे.

उत्तर प्रदेशमध्ये एकूण ४०३ जागांवर ७ टप्प्यांत निवडणूक होणार आहे. यामध्ये १० फेब्रुवारी, १४ फेब्रुवारी, २० फेब्रुवारी, २३ फेब्रुवारी, २७ फेब्रुवारी, ३ मार्च आणि ७ मार्चला मतदान होणार आहे. तर १० मार्चला मतमोजणी होणार आहे.


हेही वाचा : Corona cases in India : कोरोनाचा वेगवान फैलाव; रुग्णसंख्या थेट 2.47 लाखांवर, ओमिक्रॉनबाधित 5000 पार

First Published on: January 13, 2022 12:59 PM
Exit mobile version