UP Election Result 2022 : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा क्लीन स्विप, ४० हजार मतांनी विजयाच्या दिशेने वाटचाल

UP Election Result 2022 : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा क्लीन स्विप, ४० हजार मतांनी विजयाच्या दिशेने वाटचाल

उत्तर प्रदेशमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ४० हजार मतांनी आघाडीवर आहेत. मुख्यमंत्री योगी पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवत आहेत. यापूर्वी त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली आहे. योगींना जनतेनं मोठ्या प्रमाणात मत दिली आहेत. एकूण आतापर्यंत योगींना ६५ हजार ८०२ मतं मिळाली आहेत. तर त्यांच्याविरोधात असलेल्या चंद्रशेखर आझाद यांना ३५१६ मत मिळाली आहे. तर समाजवादी पार्टीच्या शुभावती शुक्ला यांना २१ हजार ३७५ मत मिळाली आहे. परंतु योगी ४० हजार मतांनी आघाडीवर आहेत. योगींचा विजय जवळपास निश्चित आहे.

उत्तर प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाच पुन्हा मुख्यमंत्री करण्यात येणार आहे. सध्या योगीच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा आहे. उत्तर प्रदेशात योगी सरकारला हटवण्यासाठी काँग्रेस आणि विरोध एकवटले होते. समाजवादी पार्टी आणि काँग्रेसकडून चांगली टक्कर देण्यात आली आहे. काँग्रेसची अवस्था वाईट झाली आहे परंतु समाजवादी पार्टीला लोकांनी स्वीकारले आहे. काँग्रेसने सर्वच्या सर्व ४०३ जागांवर उमेदवार उभे केले होते. मात्र त्यातील २ जागांवर आघाडी आहे. संध्याकाळपर्यंत मुख्य निकाल हाती येईल.

काँग्रेसला मोठा धक्का उत्तर प्रदेशमध्ये बसला आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजप १ जागी विजयी झाली आहे. तर २४५ जागांवर आघाडी घेतली आहे. तसेच अपना दल ११ जागांवर आघाडीवर आहे. बहुजन समाज पार्टी १ जागा, काँग्रेस २ जागा, जनसत्ता दल लोकतांत्रिक २, राष्ट्रीय लोक दल १० जागा, समाजवादी पार्टी १२०, सुहेलदेव भारतीय समाज पार्टी २ जागांवर आघाडीवर आहे.


हेही वाचा : UP Election Result 2022 : शिवसेनेला यूपीतल्या लोकांनी साफ नाकारलं, उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होणार?

First Published on: March 10, 2022 3:05 PM
Exit mobile version