यूपीमध्ये मंदिर-मशिदींवरील 4,258 भोंगे हटवले, हजारो लाऊडस्पीकरच्या आवाजावर मर्यादा

यूपीमध्ये मंदिर-मशिदींवरील 4,258 भोंगे हटवले, हजारो लाऊडस्पीकरच्या आवाजावर मर्यादा

यूपीमध्ये मंदिर-मशिदींवरील 4,258 भोंगे हटवले, हजारो लाऊडस्पीकरच्या आवाजावर मर्यादा

उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकारच्या निर्देशानंतर मंदिर आणि मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांवर धडक कारवाई करण्यात आली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भोंगे हटवण्याचे निर्देश दिले होते. यानुसार मंदिर- मशिदींसह धार्मिक स्थळांवरून लाऊडस्पीकर हटवण्यात येत आहेत. आतापर्यंत, यूपीमध्ये 4,258 लाऊडस्पीकर काढून टाकण्यात आले आहेत आणि 28,186 भोंग्यांचे आवाज निर्धारित नियमांनुसार कमी करण्यात आले आहेत.

उत्तर प्रदेशचे एडीजी प्रशांत कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार 4,258 लाऊडस्पीकर काढून टाकण्यात आले आहेत. आतापर्यंत पोलिसांनी 125 धार्मिक स्थळांवर कारवाई केली आहे. ज्या धार्मिक स्थळांवर मोठ्या आवाजात लाऊड स्पीकर लावण्यात आले आहेत. त्याबाबत रिपोर्ट मागण्यात आला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर भोंग्यांचे आवाज कमी

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भोंग्यांचा आवाज निर्धारित नियमांनुसार असावा असे निर्देश दिले होते. तसेच लाऊडस्पीकरचा आवाज केवळ धार्मिक आवारातच राहावा, त्यामुळे इतर कुणालाही त्रास होऊ नये, असेही सांगण्यात आले. योगींच्या निर्देशानंतर मंदिर असो की मशीद, अनेक ठिकाणी लाऊडस्पीकर एकतर काढून टाकण्यात आले आहेत, किंवा त्यांचा आवाज कमी करण्यात आला आहे.

उत्तरप्रदेशचे अतिरिक्त मुख्य सचिव गृह अवनीश अवस्थी यांनी राज्यातील सर्व स्टेशन प्रभारींकडून भोंग्यांच्या आवाजाबाबत रिपोर्ट मागितला आहे. ज्या ठिकाणी बेकायदेशीरपणे लाऊडस्पीकर लावण्यात आले आहेत. किंवा नियमांचे पालन करण्यात येत नाही आहे. अशा लाऊडस्पीकरबाबत ३० एप्रिलपर्यंत अहवाल पाठवण्यास सांगण्यात आले आहे. तसेच जर अहवाल पाठवण्यास वेळ लावल्यास कारवाई करण्यात येईल असे सांगण्यात आले आहेत.

लखनऊमध्ये 912 भोंगे हटवले

उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनऊमधील विविध धार्मिक स्थळांवरून लाऊडस्पीकर हटवले जात आहेत. लखनऊ झोनमध्ये विविध धार्मिक स्थळांवरून 912 लाऊडस्पीकर काढण्यात आले आणि 6400 लाऊडस्पीकरचा आवाज नियमानुसार कमी करण्यात आला आहे. तर अनेक ठिकाणी भोंग्यांची संख्या कमी करण्यात आली आहे.


हेही वाचा : इंधन दरवाढीवरून पुन्हा केंद्र-राज्य संघर्ष

First Published on: April 28, 2022 8:21 AM
Exit mobile version