होम क्वारंटाईन असणाऱ्या तरूणाने केली आत्महत्या, कारण…

होम क्वारंटाईन असणाऱ्या तरूणाने केली आत्महत्या, कारण…

आत्महत्या  

देशात लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्या मजुरांचे हाल होत आहेत. हातातलं काम गेल्यामुळे मजुरांनी गावची वाट धरली आहे. अनेक मजूर पायीच आपल्या गावी निघाले आहेत. तर कोणी मिळेल त्या वाहनाने गावी जाताना दिसत आहेत. त्यांचे होणारे हाल लक्षात घेता सरकारनेही आता खास ट्रेन पाठवून अडकलेल्यांना आपल्या गावी पाठवत आहेत. मात्र एका राज्यातून दुसऱ्या राज्यात गेल्यावर त्यांना होम क्वारंटाईन होण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मात्र उत्तर प्रदेशमध्ये एका युवकाने आत्महत्या केली आहे.

गोंडा जिल्ह्याच्या उमरी बेगमगंज क्षेत्रात गभौर या गावात क्वारंटाईन असणाऱ्या एका तरूणाने गुरूवारी गलफास घेत आत्महत्या केली. पोलीस स्टेशन प्रभारी अतुल चतुर्वेदी यांनी सांगितले की, १५ मे ला राघव प्रजापती (वय २४) हे आपल्या पत्नीसह दिल्लीहून घरी परत आले. दुसर्‍या राज्यातून आल्यामुळे,  डॉक्टरांनी त्याला १४ दिवस होम क्वारंटाईन होण्यास सांगितले होते. घरात जागेची कमतरता असल्याने या दाम्पत्याला गावाबाहेर बांधलेल्या झोपडीत अलग ठेवण्यात आले. पण गुरुवारी सकाळी राघव प्रजापती यांनी गळफास लावून आत्महत्या केली.

पत्नीशी झालेलं भांडण

आत्महत्येच्या आदल्यादिवशी पत्नीशी जोरदार भांडण झाले. या भांडणामुळे राघवने हे टोकाचं पाऊल उचलले असले असा पोलिसांना संशय आहे. सध्या  पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविला आहे.


हे ही वाचा – Video : भुकेल्या पोटी त्याने रस्त्यावरचा मेलेला कुत्रा खायला सुरूवात केली!


 

First Published on: May 22, 2020 12:28 PM
Exit mobile version