यूपीएससीची परीक्षा देणाऱ्यांसाठी खुशखबर; अजून एकदा देता येणार परीक्षा

यूपीएससीची परीक्षा देणाऱ्यांसाठी खुशखबर; अजून एकदा देता येणार परीक्षा

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) नागरी सेवा परीक्षेच्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. यूपीएससी नागरी सेवा परीक्षेच्या उमेदवारांना आणखी एक संधी देण्याचं केंद्र सरकारने मान्य केलं आहे. यासंदर्भात सरकारने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केलं आहे. त्यामुळे आता कोरोनामुळे २०२० मध्ये परीक्षा देता आली नाही. त्यांना परीक्षा देता येणार आहे.

उमेदवार रचना सिंह यांनी दाखल केलेल्या याचिकेवर गेल्या अनेक दिवसांपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. कोरोना साथीमुळे २०२० मध्ये अनेक उमेदवार यूपीएससीची परीक्षा देऊ शकले नाहीत. तसंच प्रतिकूल परिस्थितीत अनेकांना चांगल्या पद्धतीने परीक्षा देता नाही आली. त्यामुळे ते उत्तीर्ण होऊ शकले नाहीत, असं याचिकेत म्हटलं आहे. या कारणांमुळेच ज्यांचा २०२० मध्ये यूपीएससीची परीक्षा देण्याची शेवटची संधी होती त्यांना अजून एक संधी देण्यात यावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली. या याचिकेवर पुढील सुनावणी सोमवारी होणार आहे.

 

First Published on: February 5, 2021 4:41 PM
Exit mobile version