राम मंदिर उभं रहावं यासाठी ‘ही’ शबरी गेले २८ वर्ष करतेय उपवास!

राम मंदिर उभं रहावं यासाठी ‘ही’ शबरी गेले २८ वर्ष करतेय उपवास!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार आहे. रामललाच्या जन्मस्थानी प्रभू रामचंद्रांचे भव्य मंदिर उभे राहणार आहे. या मंदिरासाठी राम भक्तांनी शेकडो वर्ष संघर्ष केला आहे. अयोध्येत राम मंदिर उभे रहावे, यासाठी पडद्यामागे अनेकांनी हातभार लावला आहे. मध्य प्रदेशच्या जबलपूरमध्ये राहणाऱ्या ८२ वर्षीय उर्मिला चतुर्वेदी अशाच व्यक्तींपैकी एक आहेत. न्यूज १८ हिंदीने हे वृत्त दिले आहे.

अयोध्येतील राम मंदिरासाठी उर्मिला चतुर्वेदीची तपस्या पाहून तुम्हाला शबरीची आठवण येईल. राम मंदिरासाठी उर्मिला यांनी गेल्या २८ वर्षांपासून उपवास ठेवला आहे. उर्मिला चतुर्वेदी यांचे वय तेव्हा ५४ वर्ष होते. ६ डिसेंबर १९९२ ला आयोध्येत वादग्रस्त वास्तू जमीनदोस्त करण्यात आली, त्यावेळी उर्मिला यांनी राम मंदिराचे निर्माण होत नाही, तो पर्यंत अन्नगहण करणार नाही असा संकल्प केला.

केवळ फळांचे सेवन

गेल्या २८ वर्षात उर्मिला यांनी राम नामाचा जप करत फक्त त्या फळांचे सेवन केलं आहे. अखेर २८ वर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते भूमिपूजनाने त्यांचा संकल्प सिद्धीस जाणार आहे. राम मंदिराच्या भूमिपूजनाची तारीख जाहीर झाल्यापासून उर्मिला प्रचंड आनंदात आहेत. अयोध्येत रामललाच्या दर्शनानंतर शरयू नदीच्या किनाऱ्यावर २८ वर्षांपासून सुरु असलेला उपवास आपण सोडणार आहोत असे उर्मिला चतुर्वेदी यांनी सांगितले.

अखंड राम नामाचा जप

उद्या पंतप्रधान मोदी भव्य राम मंदिर निर्माणासाठी भूमिपूजन करतील, त्यावेळी उर्मिला दिवसभर आपल्याघरी राम नापाचा जप करतील. उर्मिला यांची अयोध्येमध्ये जाण्याची तीव्र इच्छा आहे. पण करोना संक्रमणाचा धोका आणि डॉक्टरच्या परवानगीनंतरच त्यांची ही इच्छा पूर्ण होऊ शकते.


हे ही वाचा – BMC डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना देणार ‘ताज’ हॉटेलमधील जेवण कारण…


 

First Published on: August 4, 2020 5:33 PM
Exit mobile version