Covid Vaccination: अमेरिकेत आता १२ ते १५ वर्षाच्या मुलांना मिळणार ‘Pfizer’ ची लस

Covid Vaccination: अमेरिकेत आता १२ ते १५ वर्षाच्या मुलांना मिळणार ‘Pfizer’ ची लस

देशात कोरोनाचा कहर सुरू असताना दिलासादायक बातमी समोर आली आहे. वाढत्या प्रादुर्भावादरम्यान, आता अमेरिकेत १२ ते १५ वर्षाच्या किशोर मुलांना कोरोनाची लस (Pfizer COVID-19 vaccine) देखील दिली जाणार आहे. अमेरिकेच्या प्रशासनानी १२ वर्षापर्यंतच्या मुलांना फायझरची कोरोना लस देण्यास मान्यता दिली आहे. कोरोनाच्या वाढत्या उद्रेकादरम्यान शाळेत जाणाऱ्या मुलांचे कोरोनापासून संरक्षण व्हावे, यासाठी अमेरिकेत जो बायडेनच्या प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे. दरम्यान, अमेरिकन अधिकाऱ्यांनी सांगितले की, १३ मेपासून १२ ते १५ वर्षे वयोगटातील मुलांनाही फायझरची कोविड लस दिली जाऊ शकते. यासंदर्भात अधिकृत घोषणा १२ मे म्हणजेच उद्या होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे जगभरात केवळ प्रौढ व्यक्तींना कोरोना लस दिली जात आहे. किशोरवयीन मुलांसाठी अद्याप कोणतीही लस मंजूर करण्यात आली नव्हती.

अमेरिकन सरकारच्या या निर्णयामुळे ज्यांची मुले काही दिवसांनंतर सुरू होणाऱ्या सत्रात शाळेत जाण्याची तयारी करीत आहेत, अशा पालकांना दिलासा मिळाला आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गादरम्यान, पालक बर्‍याच दिवसांपासून मुलांसाठी कोविड लसीला मंजूरी मिळेल याची वाट पाहत होते. कॅनडा हा पहिला देश आहे ज्याने १२ वर्षापर्यंतच्या मुलांसाठी फायझरच्या कोविड लसीला मंजूरी दिली आहे.

१२ वर्षापर्यंतच्या मुलांना लस मंजूर झाल्यानंतर, फायझरचे उपाध्यक्ष बिल ग्रूबर (Dr. Bill Gruber) म्हणाले की, लहान मुलांच्या लसीकरणाला मान्यता दिली हे कोविडच्या लढ्यात अत्यंत निर्णायक पाऊल आहे. अमेरिकन फूड अॅण्ड ड्रग्स अॅडमिनिस्ट्रेशन (US FDA) यांनी सांगितले की, ही लस किशोरवयीन मुलांसाठी सुरक्षित आहे आणि कोविडपासून बचाव करण्यासदेखील उपयुक्त आहे. तसेच, किशोरवयीनांसाठी ही लस मंजूर होण्यापूर्वी १२ ते १५ वर्षांच्या २००० अमेरिकन मुलांवर या लसीची चाचणी घेण्यात आली. या चाचणीनंतर असे आढळले की, ज्या मुलांना फायझर कोविड लसचे दोन्ही डोस दिले गेले त्यांना कोरोनाची लागण झाली नाही.


First Published on: May 11, 2021 12:52 PM
Exit mobile version