US Election 2020: अधिकृत मतांची मोजणी केली तर मी सहज जिंकतोय; ट्रम्प यांचा दावा

US Election 2020: अधिकृत मतांची मोजणी केली तर मी सहज जिंकतोय; ट्रम्प यांचा दावा

संपूर्ण जगाचे लक्ष लागून असलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीची मतमोजणी अद्याप सुरु आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन हे विजयाच्या उंबरठ्यावर आहेत. तर विद्यमान राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे पिछाडीवर आहेत. गुरुवारपासून बायडेन २६४ मतांसोबत आघाडीवर असून त्यांना विजयासाठी केवळ ६ मतांची आवश्यकता आहे. त्यामुळे बायडेन यांचा विजय नक्की मानला जात आहे. तर दुसरीकडे ट्रम्प यांना २१४ इलेक्टोरल मते मिळाली आहेत. दरम्यान, मतमोजणी अजून सुरु असून ट्रम्प यांनी विजयाचा दावा करत अनधिकृत मतांच्या आधारे विजय चोरी केला जात असल्याचा आरोप केला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकार परिषद घेत जो बायडेन आणि डेमोक्रॅटिक पक्षावर गंभीर आरोप केले आहेत. “जर तुम्ही अधिकृत मतांची मोजणी केलीत तर मी ही निवडणूक सहज जिंकतोय. पण जर तुम्ही अनधिकृत (मेल इन बॅलेट्स) मतेही मोजलीत तर ते बायडेन आणि डेमोकॅट्रिक पक्ष याद्वारे आमच्या हातातून विजय चोरण्याचा प्रयत्न करत आहेत. मी अनेक राज्यांमध्ये ऐतिहासिक मतांनी विजय मिळवला आहे,” असे ट्रम्प पत्रकार परिषदेत म्हणाले. यावेळी ट्रम्प यांनी ओपिनिअन पोल्सवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत हे ओपिनिअन पोल्स खोटे असल्याचा दावा केला आहे.

 

First Published on: November 6, 2020 8:47 AM
Exit mobile version