US Elecction: मराठमोळे ‘ठाणेदार’ झाले अमेरिकेतले आमदार

US Elecction: मराठमोळे ‘ठाणेदार’ झाले अमेरिकेतले आमदार

संपूर्ण जगाचे लक्ष अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष कोण होणार याकडे लागले आहे. अमेरिकेत सत्तांतर होऊन डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन विजयी होण्याची शक्यता आहे. जगाचे लक्ष अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष कोण होणार याकडे लागले असताना मराठी माणसाने दमदार कामगिरी करत सर्वांना दखल घेण्यास भाग पाडले आहे. अमेरिकेतले प्रसिद्ध उद्योजक, संशोधक आणि करोडपती म्हणून ओळख असलेले ठाणेदार यांनी मिशिगनमधून निवडणूक जिंकत आमदार बनले आहेत.

‘हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह’साठी झालेल्या निवडणुकीत भारतीय वंशाचे उमेदवार श्री ठाणेदार यांनी आमदारकी मिळवली आहे. श्री ठाणेदार यांनी तब्बल ९३ टक्के मते खिशात घालत ‘रिपब्लिकन पक्षा’च्या उमेदवाराचा पराभव केला आहे. श्री ठाणेदार यांचा २५ हजार मतांनी विजय झाला असून प्रतिस्पर्धी उमेदवाराला फक्त सहा टक्के मते मिळाली. श्री ठाणेदार यांनी दोन वर्षांपूर्वी २०१८ मध्ये राज्याच्या गव्हर्नरपदासाठी निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांनी दोन लाखांहून अधिक मते मिळाली होती. ‘श्री फॉर व्ही’ ही त्यांची प्रचारमोहीम चांगलीच गाजली होती.

श्री ठाणेदार हे मूळचे बेळगावचे आहेत. रसायनशास्त्रात त्यांनी पदवी मिळवली आहे. तर मुंबई विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. नंतर पुढील शिक्षणासाठी १९७९ मध्ये ते अमेरिकेला स्थायिक झाले. श्री ठाणेदार हे लेखक देखील आहेत. श्री ठाणेदार यांचे “ही ‘श्री’ ची इच्छा” आत्मचरित्र असून यामध्ये त्यांनी आपला संपूर्ण प्रवास उलगडलेला आहे. श्री ठाणेदार मिशिगन यांनी राज्यातून यावर्षी ‘हाऊस ऑफ रिप्रझेंटेटिव्ह’ म्हणजेच विधानसभेची निवडणूक लढवली.

त्यांचं एक यशस्वी उद्योजक – ‘ही श्रीची इच्छा’ प्रसिध्द आत्मचरित्र आहे. आजपर्यंत डेमोक्रॅटिक पक्षाचे मोठे देणगीदार असलेले श्री ठाणेदार आता पक्षाचे लोकनियुक्त प्रतिनिधी झाले आहेत. अमेरिकेतले प्रसिद्ध करोडपती उद्योगपती म्हणून ते प्रसिद्ध आहेत. ठाणेदार यांनी शून्यातून विश्व उभं केलं आहे.

 

First Published on: November 5, 2020 6:00 PM
Exit mobile version