US Elections 2020: ट्रम्प आणि बिडेनमध्ये २९ सप्टेंबरला होणार पहिली डिबेट

US Elections 2020: ट्रम्प आणि बिडेनमध्ये २९ सप्टेंबरला होणार पहिली डिबेट

सौजन्य - बिझनेस स्टँडर्ड

अमेरिकेच्या (US presidential election) राष्ट्राध्यक्ष पदासाठीच्या निवडणुकीकरता पहिली सभा (Ohio) ओहियोच्या (Cleveland) क्लीवलँड येथे २९ सप्टेंबर २०२० ला होणार आहे. ही माहिती (Commission on Presidential Debates, CPD) प्रेसिडेन्शिअल डिबेट्सच्या कमिशनच्या वतीने देण्यात आली आहे. तसेच उपराष्ट्रपती पदासाठीची डिबेट ७ ऑक्टोबर रोजी साल्ट लेट सिटी येथील (University of Utah) युनिव्हर्सिटी ऑफ उटा येथे होणार आहे. ही डिबेट उपराष्ट्रपती माईक पेंस आणि त्या पदासाठीच्या डेमोक्रेटीक उमेदावारामध्ये होणार आहे. या उमेदवाराचे नाव अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. दोन्ही नेते १५ ऑक्टोबर रोजी फ्लोरिडातील मायामीमध्ये पुन्हा एकमेंकासमोर येणार आहे. तर तिसरी डिबेट २२ ऑक्टोबर रोजी होणार आहे. या सर्व डिबेट ९० मिनिटांच्या असणार आहेत. तसेच या रात्री ९ ते १०.३० दरम्यान होणार आहे. या सर्व डिबेट्सचे अमेरिकेत थेट प्रक्षेपणही करण्यात येणार आहे.

कमिशनच्यावतीने जाहीर करण्यात आले आहे की सीपीडीला याचा आनंद आहे की, प्रेसिडेंशिअल डिबेट केसचे यजमानपद भुषवण्याची संधी वेस्टर्न रिझर्व्ह युनिव्हर्सिटी आणि क्लीवलँड क्लिनिकला मिळाली आहे. याचे आयोजन २९ सप्टेंबर रोजी क्लीवलँडच्या हेल्थ एज्युकेशन कॅम्पसमध्ये करण्यात आले आहे.

हेही वाचा –

Corona : देशात पाच जागांवर होणार लसीच्या शेवटच्या मानवी चाचणीचे परिक्षण

First Published on: July 28, 2020 8:20 AM
Exit mobile version