‘Grammy Awards’ सोहळ्यावर ओमिक्रॉनचे सावट

‘Grammy Awards’ सोहळ्यावर ओमिक्रॉनचे सावट

'Grammy Awards' सोहळ्यावर ओमिक्रॉनचे सावट

जगभरात कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनच्या विषाणूचा प्रसार वेगाने होत आहे.त्यामुळे अनेक गोष्टींवर निर्बंध लादण्यात येत आहेत.त्यातच आता अमेरिकेत लॉस एंजलिस येथे होणारा 64 वा ‘ग्रॅमी अवॉर्ड्स सोहळ्यावर ओमिक्रॉनचे सावट आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा सोहळा पुढे ढकलण्यात आला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर लवकरच या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहेत.गेल्या वर्षीसुद्धा या सोहळ्यावर कोरोनाचे सावट आले होते. त्यामुळे 14 मार्चला आयोजित करण्यात आलेला हा सोहळा पुढे ढकलण्यात आला होता. ग्रॅमी पुरस्कार हा सर्वांत मोठा वार्षिक संगीत सोहळा म्हणून ओळखला जातो. या पुरस्कारादरम्यान, नामवंत कलाकारांना त्यांच्या कामगिरीच्या सन्मानित केले जाते.

ओमिक्रॉनचा वाढता प्रादुर्भाव पाहता 31 जानेवारीला होणारा सोहळा रद्द करण्यात आला आहे. शहर आणि राज्य अधिकारी, आरोग्य आणि सुरक्षा तज्ञ,कलाकार समुदाय यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर रेकॉर्डिंग अकादमी आणि CBS ने हा 64 वा ग्रॅमी पुरस्कार सोहळा पुढे ढकलला आहे. हा सोहळा आम्ही साजरा करण्यास उत्सुक असून, या सोहळ्याची नवीन तारीख जाहीर करण्यात आली आहे,असे ‘द रेकॉर्डिंग अकादमी’ने या प्रकरणाबाबत संयुक्त निवेदन जारी केले आहे.

गेल्या वर्षी कॉन्सर्ट स्टेपल्स सेंटरऐवजी लॉस एंजेलिस कन्व्हेन्शन सेंटरमध्ये मोकळ्या मैदानी सेटवर हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. इतकेच नाही तर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत स्टेज बांधण्यात आला होता. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 2021 मध्येही हा ग्रॅमी पुरस्कार सोहळा रद्द करण्यात आला होता.


हेही वाचा – मोदींचा ताफा अडला तिथून पाकची बॉर्डर अत्यंत जवळ, पीएमच्या सुरक्षेशी खेळ, फडणवीसांचं टीकास्त्र


 

First Published on: January 6, 2022 4:16 PM
Exit mobile version