चीनमुळे त्रस्त झालेली अमेरिका अणुबॉम्ब तयार करण्यात व्यस्त!

चीनमुळे त्रस्त झालेली अमेरिका अणुबॉम्ब तयार करण्यात व्यस्त!

चीनमुळे त्रस्त झालेली अमेरिका अणुबॉम्ब तयार करण्यात व्यस्त!

चीन आणि रशियाबरोबर सतत बिघडत चाललेला संबंध आणि जागतिक पातळीवरील त्यांचा वाढता धोका लक्षात घेता अमेरिकेने पुन्हा एकदा अणुबॉम्ब बनवण्यास सुरूवात केली आहे. पुढील १० वर्षांत अमेरिका या प्रकल्पात सुमारे ७० हजार कोटी रुपये खर्च करण्याच्या तयारीत आहे. दक्षिण कॅरोलिनामधील सवाना नदीच्या काठी असलेल्या कारखान्यात आणि न्यू मेक्सिकोच्या लॉस एलमोस येथे असलेल्या फॅक्टरीत अणूबॉम्बचे औद्योगिक उत्पादन केले जाणार आहे.

हिंदी वृत्तपत्र दैनिक भास्करने ब्लूमबर्गच्या हवाल्याने ही माहिती प्रकाशित केली असून एकूण ७० हजार कोटी रुपये या प्रकल्पावर खर्च केले जाणार असल्याचे सांगितले आहे. अमेरिका आणि रशिया यांच्यात शीत युद्ध सुरू असताना, सवाना नदी जवळ असलेले कारखान्याने अमेरिकन अण्वस्त्रांसाठी ट्रिटियम आणि प्लूटोनियमचे उत्पादन तयार करत होती.

या कारखान्यात २ लाख एकरात हजारो लोकांनी काम करत असतात. आता याठिकाणी ३.७० कोटी गॅलन किरणोत्सर्गी द्रव कचरा जमा झाला आहे. ३० वर्षांनंतर पुन्हा याच ठिकाणी अणूबॉम्ब बनवले जाणार आहे. द नेशनल न्यूक्लियर सिक्योरिटी अॅमिनिस्ट्रेशन (NNSA) ही अमेरिकन संस्था अण्वस्त्रे बनवते. संस्थेच्या म्हणण्यानुसार सध्याची अण्वस्त्रे खूप जुनी झाली आहेत. त्यांनी आता बदलले पाहिजे. नवीन तंत्रज्ञानासह बनवल्यास ते अण्वस्त्रे अधिक सुरक्षित राहतील. NNSA ही संस्था नेहमी आपले जुने बॉम्ब सुधारित करत असते.

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २०१८ मध्ये या योजनेस मंजुरी दिली होती. त्यानंतर या ठिकाणी ८० खड्डे दरवर्षी तयार केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. दक्षिण कॅरोलिनामध्ये ५० आणि न्यू मेक्सिकोमध्ये ३० असणार आहे. या खड्ड्यांमध्ये, फुटबॉलसारखे प्लूटोनियमचे गोळे बनविले जाणार असून त्यामुळेच अण्वस्त्रांना चालना मिळते.

दक्षिण कॅरोलिना आणि न्यू मेक्सिकोच्या लोकांना भीती आहे की जर हा कारखाना सुरू झाला तर लोक रेडिओकिव्हिझिटीला बळी पडतील. तर ओबामा सरकारच्या काळात येथे अण्वस्त्रे तयार करण्याची मान्यता दिली होती.
ग्लोबल अफेयर्स तज्ज्ञ स्टीफन यंग यांच्या मते, ही योजना केवळ महाग नाही तर धोकादायकही आहे. कारखान्याजवळ राहणारे ७० वर्षीय पिट लाबार्ज म्हणाले की नवीन तंत्रज्ञान सुरक्षित असेल याचा पुरावा अद्याप मिळालेला नाही त्यामुळे ते धोकादायक ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.


पाकिस्तान एअरलाइन्सच्या विमानांवर अमेरिकेने घातली बंदी!

First Published on: July 10, 2020 2:16 PM
Exit mobile version