करोना चाचणीबाबत डोनाल्ड ट्रम्प यांचा रिपोर्ट आला…

करोना चाचणीबाबत डोनाल्ड ट्रम्प यांचा रिपोर्ट आला…

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा करोना चाचणीचा रिपोर्ट आला आहे. त्यांनी करोनाची चाचणी केली होती. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती व्हाइट हाऊसच्या डॉक्टरांनी दिली आहे. शुक्रवारी रात्री डोनाल्ड ट्रम्प यांनी करोनाची चाचणी केली होती. ट्रम्प यांनी ब्राझिलच्या राष्ट्रपतींच्या प्रेस सेक्रटरींना भेट दिल्यानंतर करोनाची चाचणी करावी अशी चर्चा होत होती. मात्र आता त्याचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.

करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने युरोपिय देशानंतर ब्रिटनवरील प्रवासावर निर्बंध लादले आहेत. अमेरिकेचे उपाध्यक्ष माइक पेंस यांनी शनिवारी पत्रकारांना सांगितलं की, सोमवारी रात्रीपासून नवीन प्रवाशांवर निर्बंध लागू होतील. जॉर्जियामध्ये करोना व्हायरसची दहशत पाहता राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारीची प्राइमरी निवडणूक तहकूब करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.

शुक्रवारी डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्रीय आणाबाणीची घोषणा केली होती. करोना व्हायरसला सामोर जाण्यासाठी सरकारला ५० अब्ज डॉलर्सचा निधी देण्यात येणार असल्याचं सांगितलं. अमेरिकेत करोना व्हायरसमुळे ४१ जणांनी जीव गमावला आहे. अमेरिकेतील ५० राज्यांपैकी ४६ राज्यांमध्ये करोना पसरला आहे.


हेही वाचा – करोनामुळे भारताला लागून असलेल्या पाच देशांच्या सीमा केल्या सील


 

First Published on: March 15, 2020 11:09 AM
Exit mobile version