घरताज्या घडामोडीकरोनामुळे भारताला लागून असलेल्या पाच देशांच्या सीमा केल्या सील

करोनामुळे भारताला लागून असलेल्या पाच देशांच्या सीमा केल्या सील

Subscribe

सध्या भारतातील करोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने भारता लगतच्या पाच देशांच्या सीमा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

सध्या करोना व्हायरसने देशात धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे सर्व देशातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. म्हणून केंद्र सरकाने कुणीही घाबरून जाऊ नये असं सांगितलं आहे. तसंच देशातील सर्व नागरिकांनी काळजी घ्यावी आणि सतर्कता बाळगावी असं देखील केंद्र सरकारने आवाहन केलं आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पाच देशांच्या सीमा करण्यात आल्या आहे. या सीमांवरून प्रवेश करणाऱ्या प्रवाशांवर प्रतिबंध घालण्यात आला आहे.

भारत-नेपाळ, भारत-बांगलादेश, भारत-भूतान, भारत- मान्यमार आणि भारत-पाकिस्तान या पाच देशांच्या सीमा बंद करण्याच्या निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. याशिवाय केंद्र सरकाने करोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना चार लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

सध्या १ लाख ४५ हजार करोनाबाधित रुग्ण जगभरात आढळले असून त्यापैकी ५ हजार करोनाबाधित लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतात देखील करोनाबाधितांची संख्या १००वर पोहोचली आहे. देशात सर्वाधिक करोनाबाधित रुग्ण हे महाराष्ट्रात आढळले आहेत. राज्यातील करोनाबाधितांचा आकडा ३१वर पोहचला आहे. पुण्यात १५, मुंबईत पाच, नागपूरमध्ये चार, यवतमाळमध्ये दोन, नवी मुंबईत दोन, ठाणे आणि कल्याण प्रत्येकी एक-एक आणि अहमदनगर एक करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यात शाळा आणि महाविद्यालयांना ३१ मार्चपर्यंत सुट्टी देण्यात आली आहे. तसंच महापालिका आणि नगरपालिका क्षेत्रातील मॉल्सही बंद करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे.


हेही वाचा – दहावी-बारावी, विद्यापीठाच्या परीक्षा वेळापत्रकानुसारच

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -