अमेरिकेने भारताचे निमंत्रण नाकारले

अमेरिकेने भारताचे निमंत्रण नाकारले

डोनाल्ड ट्रम्प यांनी नाकारले भारताचे निमंत्रण

भारताकडून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना येत्या २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्ताच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रण देण्यात आले होते. परंतु, डोनाल्ड ट्रम्प यांनी हे निमंत्रण नाकारले आहे. जानेवारी महिन्यात अमेरिकेत होणाऱ्या एका महत्त्वाच्या कार्यक्रमामध्ये आपण व्यस्त असल्याचे कारण सांगत त्यांनी हे निमंत्रण नाकारले आहे. ट्रम्प यांनी आपला नकार राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोबल यांना पत्र लिहून कळवले आहे.

‘हे’ आहे निमंत्रण नाकारल्यामागील कारण

भारत सरकारने काही दिवसांपूर्वी म्हणजे जुलै महिन्यामध्ये २०१९च्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना निमंत्रण पाठवल्याचे जाहिर केले होते. त्यावेळी अमेरिका-भारत यांच्यात दृढ होणाऱ्या मैत्री संबंधाच्या चर्चांना उधान आले होते. अमेरिकेनेही या निमंत्रणाला सकारात्मक प्रतिसाद दिला होता. अमेरिकेने काही दिवसांपूर्वी भारताने आणि इतर आशियाई देशांनी इराणकडून तेल आयात करु नये, असे फर्माण काढले होते. परंतु, भारताने त्या फर्मानाला झुगारुन इराणकडून तेल आयात केले. त्याचबरोबर भारताने अमेरिकेचे शत्रूराष्ट्र असलेल्या रशियाशी ‘एस-४००’ या क्षेपणास्त्र यंत्रणेचा करार केला. त्यामुळे अमेरिका आणि भारत यांच्यातील तणाव वाढत गेला. याचाच परिणाम असा की, भारतासोबत होणारी ‘२+२’ चर्चाही अमेरिकेने टाळाटाळ करत लांबवली होती. दरम्यान, या चर्चेमध्ये भारताने इराणशी असलेला करार तोडावा, अशी आशा अमेरिकेचे संरक्षण मंत्री माइक पोंपियो यांनी व्यक्त केली होती. यासाठी त्यांनी भारताला ४ नोव्हेंबर पर्यंतची मुदतही दिली होती. परंतु, त्याचा भारतावर काहीच परिणाम झाला नाही. भारताने नोव्हेंबर महिन्यातही इराणशी असलेला तेल व्यवहार चालूच ठेवला.

 

भारताला मोठा फटका

जानेवारी महिन्यातील ट्रम्प यांच्या दौऱ्यामुळे भारताला व्यापाराच्या दृष्टीने भरपूर फायदा झाला असता. शिवाय, अमेरिका भारतातील आयटी क्षेत्रात गुंतवणूक करणार होते, त्यामुळे आयटी क्षेत्रात नाविन्यपूर्ण असे बदल या भेटीतून घडणार होते. त्याचबरोबर दोन्ही देशातील व्यापारी संबंधही दृढ होणार होते. भारत अमेरिकेकडून नागरी विमानेही विकत घेणार होते.


हेही वाचा – प्रजासत्ताक दिनासाठी ‘ट्रम्प’ना भारताचे निमंत्रण!

First Published on: October 28, 2018 12:39 PM
Exit mobile version