घरदेश-विदेशप्रजासत्ताक दिनासाठी 'ट्रम्प'ना भारताचे निमंत्रण!

प्रजासत्ताक दिनासाठी ‘ट्रम्प’ना भारताचे निमंत्रण!

Subscribe

२०१९ च्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भारताकडून निमंत्रण देण्यात आलं आहे. ट्रम्प यांनी हे निमंत्रण स्विकारल्यास ते भारताच्या प्रजासत्ताक दिनी हजेरी लावणारे दुसरे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ठरतील.

भारताकडून मिळालेल्या या खास निमंत्रणावर अद्याप डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. पंतप्रधान कार्यालयाकडून एप्रिल महिन्यात ट्रम्प यांना याबाबतचे रितसर आमंत्रण पाठवण्यात आले होते. दरम्यान उपल्बध माहितीनुसार ट्रम्प सरकार या निमंत्रणाचा विचार करत असल्याचे समजत आहे. ट्रम्प यांनी हे निमंत्रण स्विकारल्यास ते भारताच्या प्रजासत्ताक दिनी हजेरी लावणारे दुसरे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ठरतील. याआधी २०१५ सालच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमामध्ये अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी उपस्थिती लावली होती. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प हे मोदी सरकारचे दुसरे पाहुणे असतील.

संबंधांमध्ये सुधार येणार?

अनेक मुद्द्यांना घेऊन सध्या अमेरिका आणि भारतामध्ये तणावाचे वातावरण आहे. भारताचे इराणसोबतचे व्यवहार तसंच व्यापार संबंध, व्यापाराचे दर आणि रशियाकडून एस ४०० मिसाईल खरेदी करण्यासाठी देण्यात आलेला प्रस्तावित सौदा अशा अनेक मुद्द्यांवरुन, दोन्ही देशांमध्ये सध्या कोल्ड वॉर सुरु आहे. त्यामुळे भारताचे ओबामा सरकार असताना अमेरिकेशी असलेले संबंध आता ट्रम्प सरकारच्या कारकिर्दीतही तसेच राहणार की नाही? असा सवाल उपस्थित केला जात आहे. आता या सर्व पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प काय निर्णय घेतात? यावर सगळ्यांचच लक्ष लागून राहिलं आहे. दरम्यान प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाचं निमंत्रण स्विकारुन डोनाल्ड ट्रम्प भारतात आल्यास, दोन्ही देशातील समस्यांवर परस्पर चर्चेवरुन तोडगा निघू शकेल का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

प्रजासत्ताकदिनी हजेरी लावलेले पाहुणे

मोदी सरकारच्या ४ वर्षांच्या कारकिर्दीमध्ये,  प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी विविध देशाच्या प्रमुखांनी हजेरी लावली होती.
२०१५ – बराक ओबामा (अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष )
२०१६ –  फ्रँकस औलांद (फ्रान्सचे अध्यक्ष )
२०१७ –  मोहम्मद बिन (अबुधाबीचे प्रिन्स)
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -