कोरोनाचे संकट त्यात वर्णभेदाविरोधात निदर्शने; निवडणुकीत ट्रम्पच्या यशाचा मार्ग खडतर

कोरोनाचे संकट त्यात वर्णभेदाविरोधात निदर्शने; निवडणुकीत ट्रम्पच्या यशाचा मार्ग खडतर

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

अमेरिकेत राष्ट्रापतीपदाच्या निवडणुका अवघ्या पाच महिन्यांवर आल्या असताना देशात मात्र असंतोषाचे वातावरण पसरल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या तीन महिन्यांपासून कोरोनाने अमेरिकेत हाहाकार माजवला आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून एका कृष्णवर्णीय व्यक्तीच्या मृत्यूमुळेही राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना सध्या अनेक राजकीय विरोधकांचा सामना करावा लागत आहे. जर आता निवडणुका झाल्या असत्या तर ट्रम्प नक्कीच अपयशी ठरले असते, अशा चर्चा राजकीय वर्तुळात होत आहेत. राष्ट्रपती निवडणुकीत पश्चिमेतील सल्लागार आणि कॅम्पेनचे सहकारी हे ट्रम्प यांच्या पुन्हा राष्ट्रपतीपदी निवडणून येण्याबाबत साशंक आहेत. त्यांच्या सल्लागारांच्या मते, कोरोना विषाणूपासून लढण्याच्या ट्रम्प यांच्या धोरणाविरोधात आणि आता वर्णभेदाच्या मुद्द्यावरून देशभरात निदर्शने केली जात आहेत.

ही ठरू शकतात कारण

गेल्या महिन्यात २५ तारखेला जॉर्ज फ्लॉयड या कृष्णवर्णीय व्यक्तीचा मृत्यू अमेरिकेतील चार पोलिसांमुळे झाला होता. त्यांनी जॉर्जला गुडघ्याच्या सहाय्याने मान दाबून मारून टाकले होते. या घटनेनंतर अमेरिकेसह संपूर्ण जगात याचा निषेध नोंदवला गेला. त्यामुळे अमेरिकेतील राजकीय वातावरण चांगलेच पेटले असून सत्ताधारी डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात या घटना गेल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून अमेरिकेत सर्वाधिक कोरोना रुग्ण असल्याचे पाहायला मिळत आहे. सोमवारी सकाळपर्यंत २० लाख ७७ हजारच्या वर कोरोनाबाधितांची संख्या झाली असून एकूण १ लाख १२ हजार ४६९ हून अधिक जणांचा या विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, ७ लाख ६१ हजार रुग्ण या आजारातून बरे होऊन घरी गेले आहेत. कोरोनाबाधितांपैकी एकूण ६ टक्के लोकांचा मृत्यू झाला असून ३३ टक्के लोकं त्यातून बरे झाले आहेत.

हेही वाचा –

आत्मसंतुष्ट होणं धोक्याचं, जागतिक स्तरावर परिस्थिती बिघडतेय – WHO

First Published on: June 9, 2020 1:39 PM
Exit mobile version