अमेरिकेचा चीनला धक्का; ह्यूस्टनमधील चीनी दूतावास सुरक्षा दलाने घेतला ताब्यात

अमेरिकेचा चीनला धक्का; ह्यूस्टनमधील चीनी दूतावास सुरक्षा दलाने घेतला ताब्यात

अमेरिका-चीनमधील तणाव आता शिगेला पोहोचला आहे. अमेरिकेने चीनला ह्यूस्टनमधील दूतावास रिकामा करण्याचे आदेश दिल्यानंतर अमेरिकेने शनिवारी ह्यूस्टनमधील दूतावास अधिकृतपणे बंद केला आहे. चार दशकांपूर्वी सुरू करण्यात आलेला हा दूतावास पहिल्यांदा करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेने चीनला दुतावास बंद करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर लगेचच अमेरिकेच्या सुरक्षा दलाच्या जवानांनी हा दूतावास ताब्यात घेतला आहे. यामुळे चीनला दणका बसला आहे. व्यापारयुद्ध, कोरोना विषाणूवरून दोन्ही देशात तणाव वाढला असतानाच आता अमेरिकेने चीनचा दूतावास ताब्यात घेत बंद केला आहे.

अमेरिकेने बुधवारी चीनला ७२ तासांमध्ये ह्यूस्टनमधील दूतावास बंद करण्याचे आदेश दिले होते. मात्र, आता अमेरिकेने शनिवारी आक्रमक भूमिका घेत चीनचा दूतावास बंद केला आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पोम्पियो यांनी या दूतावासातून हेरगिरी आणि बौद्धिक मालमत्तेची चोरी करण्यात येत असल्याचा आरोप केला होता. ७२ तासात दूतावास बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते. दरम्यान, आता दूतावास रिकामा करण्याची मुदत संपल्यानंतर दूतावासवरील चीनचे ध्वज आले आहेत. तसंच अमेरिकी अधिकाऱ्यांनी दूतावासाचा ताबा घेतला असून दूतावासाकडे येणारे सर्व रस्ते बंद करून परिसराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

ह्यूस्टनमधील चिनी दूतावास बंद करण्याच्या अमेरिकेच्या निर्णयाला पलटवार करत चीनने शुक्रवारी चेंगदू येथील अमेरिकन वाणिज्य दूतावास बंद करण्याचा आदेश दिला. दूतावास बंद करण्याचे आदेश देताना चीनने अमेरिकेच्या अंतर्गत कामकाजात हस्तक्षेप करून राष्ट्रीय सुरक्षेच्या हिताचे नुकसान केल्याचा आरोप केला आहे.

 

First Published on: July 25, 2020 3:33 PM
Exit mobile version