CoronaVirus: कोरोना पॉझिटिव्ह असल्याने महिलेची आत्महत्या! ऑडिओ व्हायरल

CoronaVirus: कोरोना पॉझिटिव्ह असल्याने महिलेची आत्महत्या! ऑडिओ व्हायरल

आत्महत्या

कोरोना विषाणूच्या संकटात अनेक धक्कादायक घटना समोर येत आहे. दरम्यान आता उत्तर प्रदेशमधील महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या महिलेचा आत्महत्या केल्यानंतर एक ऑडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे म्हणत आहे. ही घटना उत्तर प्रदेशमधील तरया सुजार ठाणे हद्दीत माधोपूर गावातील आहे.

या महिलेचे नाव ममता असे असून तिचा ऑडिओ समोर आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितनुसार, गेल्या अनेक दिवसांपासून ती ताप आणि सर्दीने आजारी होती. बुधवारी घरी कोणी नसताना ममताने गळफास लावून आत्महत्या केली. त्यानंतर ममताचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. मात्र मृतदेह शवविच्छेदन झाल्यानंतरही रुग्णालयात पडून आहे. तिचा मृतदेह घेण्यासाठी कुटुंबातील कोणची पुढे येत नाही आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले आहे.

मृत महिला ममता ही आपल्या पती राजकिशोर आणि मुलांसोबत सुरतमध्ये राहत होती. तिचा नवरा सुरतमध्ये मजुरी करीत होता. मात्र लॉकडाऊन जाहीर झाल्यामुळे ती आपल्या कुटुंबासहित तरया सुजाना या आपल्या गावी परतली. गावी परतल्यानंतर त्याचे मंगळवारी स्क्रिनिंग करण्यात आले. मग त्यांना २१ दिवसांसाठी क्वारंटाईन होण्याची सूचना दिली होती. मात्र बुधवारी ममताने गळफास लावून आत्महत्या केली. आतापर्यंत उत्तर प्रदेशमध्ये ३ हजार ७१ कोरोनाचे रुग्ण आढळले आहे. त्यापैकी ६२ जणांचा मृत्यू झाला आहे.


हेही वाचा – देशात तिसरी दुर्घटना: आता तमिळनाडूत बॉयलरचा स्फोट!


 

First Published on: May 7, 2020 11:11 PM
Exit mobile version