घरताज्या घडामोडीदेशात तिसरी दुर्घटना: आता तमिळनाडूत बॉयलरचा स्फोट!

देशात तिसरी दुर्घटना: आता तमिळनाडूत बॉयलरचा स्फोट!

Subscribe

तमिळनाडूच्या कुड्डालोर येथील सार्वजनिक क्षेत्रातील कोळसा खाण कंपनीत बॉयलरचा स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये सात जण जखमी झाले आहेत. नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन प्लांटमध्ये हा स्फोट झाला आहे. माहितीनुसार, बॉयलरच्या स्फोटोत किमान सात लोक जखमी झाले असून त्यापैकी चार जण गंभीर जखमी आहेत.

या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच पाच पथक घटनास्थळी पोहोचले. तसेच नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन किंवा एनएलसीच उच्च अधिकारी देखील घटनास्थळी दाखल झाले आहे. तमिळनाडू पोलिस आणि अग्निशमन दलाच्या पथकामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.

- Advertisement -

एनएलसी इंडिया लिमिटेड ही जीवाश्म इंधन खाण क्षेत्रात आणि भारतीय औष्णिक वीजनिर्मिती क्षेत्रातील भारताची नवरत्न कंपनी आहे.

या कोरोनाच्या संकटात आज देशात दोन भयानक दुर्घटना झाल्या. आंध्र प्रदेशातील विशाखापट्टममधील केमिकल प्लांटमध्ये गॅस गळती झाल्याची घटना सकाळी समोर आली. या गॅस गळतीमुळे ११ जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक हजारहून अधिक लोक जखमी झाले आहेत. दुसरी दुर्घटना छत्तीसगडमधील घडली असून पेपर मिलमध्ये गॅस गळतीमुळे सात मजुरांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – राजकीय नेतृत्‍वाने निर्णय घेण्याची गरज; विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा सल्ला


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -