उत्तराखंडच्या पौरी गढवाल येथे बस अपघातात 25 जणांचा मृत्यू; SDRF कडून 21 जणांची सुटका

उत्तराखंडच्या पौरी गढवाल येथे बस अपघातात 25 जणांचा मृत्यू; SDRF कडून 21 जणांची सुटका

उत्तराखंडमधील पौरी गढवाल जिल्ह्यात मंगळवारी संध्याकाळी वऱ्हाड घेऊन जाणारी एक बस 500 मीटर खोल दरीत कोसळली. या अपघातात 25 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातावेळी या बसमध्ये सुमारे 45 ते 50 प्रवासी प्रवास करत होते. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. एसडीआरएफची चार पथकाकडून बचावकार्यात गुंतली आहेत. आतापर्यंत 21 जणांना वाचवण्यात यश आले आहे.

उत्तराखंडचे डीजीपी अशोक कुमार यांनी या घटनेबाबत माहिती दिली. डीजीपी म्हणाले, पौरी गढवालच्या बिरखल भागात काल रात्री झालेल्या बस अपघातात 25 जणांचा मृत्यू झाला आहे. पोलीस आणि एसडीआरएफने रात्रभर 21 जणांची सुटका केली आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापूर्वी उत्तराखंडचे एसडीआरएफ कमांडंट मणिकांत मिश्रा यांनी देखील मृतांची माहिती दिली आहे. SDRFच्या 4 पथके घटनास्थळी आहेत.

येथे जाण्यापूर्वी हरिद्वार शहराचे एसपी स्वतंत्र कुमार सिंह यांनी रात्री उशिरा बस अपघाताची माहिती दिली. शहर एसपी म्हणाले, “लालधंग येथून मिरवणूक निघाली होती. वाटेत त्याचा अपघात झाला. कुटुंबीयांकडून माहिती घेण्यात आली आहे. घटनास्थळी पौरी पोलिसांकडून बचावकार्य सुरू आहे.

त्याचवेळी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी ट्विट करून या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी लिहिले की, “सुमारे 45 जणांनी भरलेल्या बसच्या पौरी जिल्ह्यातील सिमडी गावाजवळ झालेल्या भीषण बस अपघाताचा आपत्ती नियंत्रण कक्षाकडून आढावा घेताना, संबंधित अधिकाऱ्यांकडून घटनेबाबत सविस्तर माहिती घेण्यात आली.

त्यांनी पुढच्या ट्विटमध्ये लिहिले की, “जिल्हादंडाधिकारी पौरी यांच्याशी फोनवरून बोलून मदत आणि बचाव कार्य पूर्ण दक्षतेने करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सरकारी स्तरावर सर्वतोपरी मदत केली जात आहे, त्यादृष्टीने मदतकार्यासाठी पथके पाठवण्यात आली आहेत आणि बचाव कार्य पूर्ण झाले आहे.


वांद्रे-वरळी सी-लिंकवर भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू

First Published on: October 5, 2022 10:10 AM
Exit mobile version