Uttarakhand by-elections Result : Cm धामींचा ५८ हजारांपेक्षा अधिक मतांनी विजय, पंतप्रधानांकडून कौतुकाची थाप

Uttarakhand by-elections Result : Cm धामींचा ५८ हजारांपेक्षा अधिक मतांनी विजय, पंतप्रधानांकडून कौतुकाची थाप

Uttarakhand by-elections Result : Cm धामींचा ५८ हजारांपेक्षा अधिक मतांनी विजय, पंतप्रधानांकडून कौतुकाची थाप

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी चंपावत विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये एतिहासिक विजय मिळवला आहे. शुक्रवारी निवडणूक निकाल जाहीर करण्यात आला आहे. धामी यांनी 55 हजारपेक्षा जास्त मतांनी विजय मिळवला आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी चंपावत विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत.

उत्तराखंडमधील चंपावत विधानसभा जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामीसुद्धा निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यांनी चंपावत मतदारसंघातून विजय मिळवला आहे. त्यांनी काँग्रेस उमेदवार निर्मला गहातोडी, सपाचे उमेदवार मनोज कुमार आणि अपक्ष उमेदवार हिमांशू गारकोटी यांचा पराभव करून विजय मिळवला आहे. मतमोजणीमध्ये धामी यांनी पहिलीच आघाडी मिळवली होती. भाजपचे उमेदवार सीएम पुष्कर सिंह धामी 54 हजार 121 मतांनी विजयी झाले.

मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी चंपावत विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेस उमेदवार निर्मला गहातोडी, सपाचे उमेदवार मनोज कुमार आणि अपक्ष उमेदवार हिमांशू गारकोटी यांचा पराभव करून विजय मिळवला आहे. उल्लेखनीय आहे की मतमोजणीच्या पहिल्या फेरीत सीएम पुष्कर यांनी आधीच आघाडी घेतली होती. भाजपचे उमेदवार सीएम पुष्कर सिंह धामी 58 हजार 258 मतांनी विजयी झाले.

काँग्रेस उमेदवार निर्मला गहातोडी यांना 3233, भाजप उमेदवार पुष्कर धामी यांना 58,258, सपा उमेदवार मनोज कुमार यांना 409, अपक्ष उमेदवार हिमांशू गारकोटी यांना 399 आणि NOTA ला 372 मते मिळाली.

मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या विजयामागे 3 मोठी कारणे आहेत. यामध्ये पुष्कर सिंह धामी हे स्वतः मुख्यमंत्री असणे, पुष्कर सिंह धामी पाचव्या विधानसभेसाठी त्यांनी 14 फेब्रुवारीला निवडणूक लढवली होती. यावेळी त्यांचा पराभव झाला होता. पंरतु त्यांच्या नेतृत्वामध्ये भाजपचा विजय झाला होता. यामुळे त्यांना मुख्यमंत्री करण्यात आले होते. यावेळी त्यांचा विजय पक्का मानला जात होता. तसेच पुष्कर सिंह यांचे युवा नेता आणि युवा मुख्यमंत्री असल्याचा फायदा झाला आहे. केंद्रीय नेत्यांमध्ये त्यांचा चांगला संबंध आहे.

पंतप्रधानांकडून धामींचे कौतूक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री पुष्कर धामी यांच्या विजयावर प्रतिक्रिया दिली आहे. धामी यांना पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच धामींच्या नेतृत्वात उत्तराखंडच्या विकासाला गती मिळेल असे पंतप्रधान म्हणाले आहेत.


हेही वाचा : काश्मीर फाईल्सची पुनरावृत्ती होतेय, काश्मिरी पंडितांच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी आक्रमक

First Published on: June 3, 2022 5:23 PM
Exit mobile version