Uttarakhand Election Results 2022: उत्तराखंडमधील ‘या’ हॉट सीट्सवर सर्वांच्या नजरा, मुख्यमंत्र्यांसह दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

Uttarakhand Election Results 2022: उत्तराखंडमधील ‘या’ हॉट सीट्सवर सर्वांच्या नजरा, मुख्यमंत्र्यांसह दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

Uttarakhand Election Results 2022: उत्तराखंडमधील 'या' हॉट सीट्सवर सर्वांच्या नजरा, मुख्यमंत्र्यांसह दिग्गजांची प्रतिष्ठापणाला

उत्तराखंडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या 70 जागांसाठीची मतमोजणी सुरु आहे. इतर राज्यांच्या तुलनेने भौगोलिक दृष्ट्या छोटे असलेले उत्तराखंड राज्य राजकीय दृष्ट्या फार महत्त्वाचे आहे. सध्याचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, माजी मुख्यमंत्री हरीश रावत, भाजप प्रदेशाध्यक्ष मदन कौशिक, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गणेश गोदियाम, आम आदमी पक्षाचे कर्नल अजय कोथियाल आणि विरोधी पक्षनेते प्रीतम सिंह यांच्यासह राज्य सरकारमधील अनेक मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. उत्तराखंडमधील दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या नेमक्या किती हॉट सीट्स आहेत आपण जाणून घेऊ…

खातिमा
उत्तराखंडमधील खातिमा या जागेवर सर्वांच्या नजरा लागून आहेत. कारण सध्याचे भाजपचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी याच जागेवरून निवडणुक लढले आहेत. काँग्रेसचे भुवन कापरी यांच्याविरोधात ते निवडणुकीच्या रंगणात उतरले आहेत. दरम्यान आपचे उमेदवार एसएस क्लेर देखील निवडणुकीच्या रिंगणात असल्याने ही निवडणुक अतिशय रंजक होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पदावरील पुष्कर सिंह धामी ही निवडणुक जिंकणार का याकडे सर्वांचे लक्ष आहे. सध्याच्या टेन्डमध्ये भुवन खापरी हे 14 हजार मतांनी पुष्कर सिंह धामी यांच्या पुढे आहेत.

लालकुआ
उत्तराखंडमधील लालकुआ जागेवरून काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत या जागेवरून निवडणुक लढवली, काँग्रेसकडून ते मुख्यमंत्री पदाचे दावेदार आहेत. त्यामुळे काँग्रेसचे या जागेवर विशेष लक्ष आहे. त्यांना भाजपचे मोहन सिंग बिश्त यांच्याकडून कडवी झुंज दिली जातेय. या जागेवर काँग्रेसच्या बंडखोर उमेदवार संध्या दलकोटी यांना उमेदवारी दिल्याने हरीष रावत यांच्यासमोर आव्हान खरतर होत आहे. सध्या लालकुआमधून मोहन सिंग बिश्त आघाडीवर दिसत आहे.

धक्का
विरोधी पक्षनेते प्रीतम सिंह आणि भाजपचे रामशरण नौटिा यांच्यात लढत होत आहे. भाजप नेते आणि प्रसिद्ध गायक जुबिन नौटियाल यांनी वडिलांसाठी जोरदार प्रचार केला.

हरिद्वार
भाजपचे प्रदेशाध्यक्ष मदन कौशिक आणि काँग्रेसचे सत्यपाल ब्रह्मचारी यांच्यात स्पर्धा दिसून येत आहे.

श्रीनगर गढवाल
या जागी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गणेश गोदियाल यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यांच्याविरोधात भाजपचे उमेदवार आणि उच्च शिक्षणमंत्री डॉ. धनसिंह रावत यांनी निवडणुक लढवली. त्यामुळे ही निवणुक चांगलीच रंगात आली आहे. सध्या गणेश गोदियाल हे या जागेवरून आघाडीवर आहे.

लॅन्सडाऊन
माजी कॅबिनेट मंत्री हरकसिंग रावत यांची सून अनुकृती गुसैन काँग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणात असल्यामुळे सर्वांच्या नजरा या जागेवर लागल्या आहेत. अनुक्रितींच्या तिकीट प्रकरणामुळे हरकसिंग रावत यांना भाजपला सोडचिठ्ठी द्यावी लागली होती. परंतु या जागेवर सध्या भाजप उमेदवार दिलीप रावत आघाडीवर दिसत आहेत.

गंगोत्री
हॉट सीट गंगोत्रीच्या निकालाबाबतही उत्सुकता आहे. या जागेबाबत एक समज आहे की, ज्या पक्षाचा उमेदवार या जागेवरून निवडणूक जिंकतो, तोच पक्ष राज्यात सरकार स्थापन करतो. गंगोत्री जागेवर आम आदमी पक्षाचा मुख्यमंत्री चेहरा कर्नल अजय कोथियाल (सेनी) रिंगणात असल्याने ही लढत अतिशय रंजक मानली जात होती. मात्र सध्याच्या निकालाच्या ट्रेन्डमध्ये त्यांचा करिश्मा दिसून आला नाही. भाजपचे सुरेश चौहान यांच्या हाती सत्ता लागणार की काँग्रेसचे माजी आमदार विजय पाल सिंह सजवान यशस्वी होणार हे आज समोर येणार आहे. परंतु सध्याच्या आकडेवारीनुसार. गंगोत्रीमध्ये भाजप उमेदवार सुरेश चौहान यांचे पारडे जड आहे.

नवी टिहरी
काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झालेल्या किशोर उपाध्याय यांना या जागेवर उमेदवारी देण्याचे मागच्या कारणाचा आज उघड होणार आहे. या जागेवर तिकीट कापण्यात आल्याने काँग्रेसमधून निवडणूक लढवलेले धनसिंग नेगी आणि जन एकता पक्षाचे दिनेश धनई यांच्यात चुरस आहे. परंतु किशोर उपाध्याय यांनाच आता मतदारांची पसंती दिसतेय.

नरेंद्रनगर
या जागेवर भाजप सरकारचे कॅबिनेट मंत्री सुबोध उनियाल हे त्यांच्या पक्षाचे बंडखोर ओम गोपाल रावत यांच्या विरोधात आहेत, ज्यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. चुरशीच्या स्पर्धेत कोण बाजी मारणार, हेही आज कळणार आहे. सध्या ओम गोपाल आणि सुबोध उनियाल यांच्यात काटे की टक्कर आहे.

चौबत्ताखल
या जागेवर कॅबिनेट मंत्री सतपाल महाराज दुसऱ्यांदा रिंगणात आहेत. त्यांचा सामना काँग्रेसच्या केसरसिंग नेगी यांच्याशी आहे. येथे त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सतपाल महाराज सध्या आघाडीवर आहे.

गदरपूर, सोमेश्वर, कालाधुंगी, दिदिहाट, कोटद्वार, बाजपूर, हरिद्वार ग्रामीण, नैनिताल, मसूरी या जागा देखील उत्तराखंडसाठी राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जात आहेत.


Uttarakhand Election Result 2022 : उत्तराखंडमध्ये भाजपचा बहुमताकडे कल; जाणून घ्या किती जागांवर कोण पुढे?


First Published on: March 10, 2022 12:58 PM
Exit mobile version