नवजात बाळाला महिलेने कारमधून दिलं फेकून, सीसीटीव्ही फुटेज वायरल

नवजात बाळाला महिलेने कारमधून दिलं फेकून, सीसीटीव्ही फुटेज वायरल

नवजात बाळाला महिलेने कारमधून दिलं फेकून

उत्तर प्रदेशच्या मुजफ्फर नगरमध्ये एक महिलेने नवजात बाळाला रस्त्यावर फेकून दिल्याची घटना समोर आली आहे. एका कारमधून आलेली ही महिला २ दिवसांच्या बाळाला रस्त्यावर टाकून फरार झाली. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. दरम्यान, ही महिला बाळाची आई असल्याचे म्हटलं जात आहे.

कारमधून बाळाला दिलं टाकून!
उत्तर प्रदेशच्या मुजफ्फर नगरमधील मुस्तफा गल्लीमध्ये हा प्रकार घडला आहे. बुधवारी सकाळी कारमधून आलेल्या एका महिलेने दोन दिवसांच्या बाळाला रस्त्यावर टाकून दिले. बाळाचा रडण्याचा आवाज आल्यानंतर मुस्तफा गल्लीतील नागरीक घराबाहेर आले. त्यांनी याप्रकरणी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बाळाला ताब्यात घेतलं. त्यानंतर बाळाला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं.

नवजात बाळ

सध्या बाळ सुरक्षित असून त्याच्यावर उपचार सुरु आहे. मुस्तफा गल्लीतील अनेक नागरिकांनी बाळाला दत्तक घेण्यासाठी इच्छा व्यक्त केली असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

आरोपी महिलेचा शोध सुरु
दरम्यान, पोलीस तपासात मुस्तफा गल्लीच्या एका घराला लावलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही घटना कैद झाली. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये कारमधून आलेली एक महिला गाडीच्या खिडकीमधून बाळाला रस्त्यावर टाकून जाताना स्पष्ट दिसत आहे. मात्र, या महिलेने तोंडाला कापड बांधलेले होते. बाळाला रस्त्यावर टाकून दिल्यानंतर ही महिला कार घेऊन फरार झाली. ही महिलाच बाळाची आई असल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांकडून आरोपी महिलेचा शोध सुरु आहे.

First Published on: June 7, 2018 8:22 AM
Exit mobile version