Vaccination: देशातील २५ टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण, २ ऑक्टोबरपासून आणखी एका लशीचा पर्याय

Vaccination: देशातील २५ टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण, २ ऑक्टोबरपासून आणखी एका लशीचा पर्याय

देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या (Third wave of corona) पार्श्वभूमीवर लसीकरण (Vaccination) मोहीमेला वेग आला असून देशात तरुण नागरिकांच्या २५ टक्के नागरिकांना कोरोना विरोधी लसीचे दोनही डोस देण्यात आले असून त्यांचे लसीकरण पूर्ण झाले असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. (Vaccination: 25% of citizens in india have been fully vaccinated)  मंगळवारी देशात ५३ लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. लसीचे दोनही डोस घेणाऱ्यांची संख्या आता ८७.५९ करोड इतकी झाली आहे. तर २ ऑक्टोबरपासून देशात नव्या लसीचा पर्याय उपलब्ध होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार आणि झायडस कॅडिला (zydus cadila) आपली झायकोव-डी (zycov d) ही पहिली लस भारतात लाँच करण्याची शक्यता असून लसीची किंमत आणि इतर गोष्टींबाबत अंतिम निर्णय घेणे बाकी असल्याचे सांगण्यात येत आहे.

२ ऑक्टोबर गांधी जयंतीच्या मुहूर्तावर झायकोव-डी ही लस लाँच होण्याची शक्यता आहे. भारताच्या औषध महानियंत्रकाने गेल्या माहिन्यात झायडस कॅडिलाच्या स्वदेशी विकसीत सुईमुक्त लसीला आपतकालीन वापरासाठी मंजूरी दिली. देशातील १२-१८ वयोगटातील मुलांना ही लस देण्यात येणार आहे. झायकोव-डी लस लाँच झाल्यास देशातील लसीकरण मोहीमेला आणखी वेग येण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेश,महाराष्ट्र,मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये ६ करोडहून अधिक नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. या राज्यात कोरोना विरोधी लसीचे दोन्ही डोस घेणाऱ्यांची संख्या अधिक आहे. गुजरातमध्ये ४० टक्के तरुणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे तर मध्य प्रदेशमध्ये २७ टक्के, महाराष्ट्रात २६ टक्के आणि उत्तर प्रदेशमध्ये १३.३४ टक्के तरुणांनी कोरोना विरोधी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत.

त्याचप्रमाणे पश्चिम बंगाल,राजस्थान,कर्नाटक सारख्या राज्यांमध्ये ५ करोडहून अधिक नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. तर चार राज्य आणि दोन केंद्र शासित प्रदेशांमध्ये १ करोड नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. उत्तराखंडमध्ये ४०टक्के, जम्मू-काश्मीरमध्ये ३९ टक्के, दिल्लीत ३५ टक्के आणि छत्तीगड राज्यात २७ टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. तसेच पंजाबमध्ये २२.४ टक्के आणि झारखंडमध्ये १५.४३ टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

 


हेही वाचा – Coronavirus Update in India: आगामी सण-उत्सव काळजीपूर्वक साजरे करा – नीती आयोग

First Published on: September 30, 2021 8:05 AM
Exit mobile version