Vaccination: कोरोनातून बरे झाल्यावर ६ महिन्यांनी लस घेण्याचा NTAGIचा सल्ला

Vaccination: कोरोनातून बरे झाल्यावर ६ महिन्यांनी लस घेण्याचा NTAGIचा सल्ला

Coronavirus : कोरोनाबाधितांना आता वॅक्सीनची गरज नाही, आरोग्य तज्ज्ञांचा दावा

देशात मोठ्या प्रमाणात लसीकरण सुरु आहे. देशात लसीचा तुटवडा देखिल जाणवत आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतल्याने कोरोनाचा रोखण्यास मदत होत आहे. त्यामुळे लसीकरणावर जास्त भर देण्यात आहे. तांत्रिक सल्लागार समूहाने ( NTAGI – National Immunization Technical Advisory Group) लसीकरणाबाबत काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. कोरोना होण्याआधी लस घेतल्यास काही अडचण नाही. मात्र कोरोना होऊन गेल्यानंतर लस कधी घ्यावी याविषयी डॉक्टरांनी अनेक वेळा कोरोनातून बरे झालेल्यांनी ३ महिन्यांनंतर लस घ्यावी असा सल्ला देण्यात आला होता. मात्र NTAGI ने कोरोनातून बरे झाल्यानंतर व्यक्तीने ६ महिन्यांनंतर लस घेण्याचा सल्ला NTAGIने दिला आहे. याआधीही CDC (Centers for Disease Control and Prevention)ने कोरोनातून बरे झालेल्या व्यक्तीने ९० दिवसांनी लस घ्यावी असा सल्ला दिला होता.

NTAGI कोविशिल्ड लसीच्या दोन डोसांमधील अंतर १२ ते १६ आठवड्यांचे असावे अशा सूचना देखिल देण्यात आल्या आहे. राज्यात सध्या १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण लसीच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे स्थगित करण्यात आले आहे. या वयोगटातील नागरिकांसाठी मागवलेल्या लसी दुसऱ्या लसीच्या डोसाच्या प्रतिक्षेत असणाऱ्या नागरिकांना देण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. राज्यात सध्या २० लाख नागरिक हे लसीच्या दुसऱ्या डोसच्या प्रतिक्षेत आहेत.

त्याचप्रमाणे राज्यात सध्या १६ लाख नागरिक कोविशिल्ड लसीच्या दुसऱ्या डोससाठी आणि ४ लाख नागरिक कोव्हॅक्सिन लसीच्या दुसऱ्या डोसच्या प्रतिक्षेत आहेत. तर राज्यात कोविशिल्ड लसीचे केवळ ७ लाख डोस बाकी आहेत. तर कोव्हॅक्सिन लसीचे केवळ ३ लाख डोस बाकी आहेत. राज्यासह देशातील अनेक लसीकरण केंद्रावरून  नागरिकांना लसीअभावी परत जावे लागत आहे.


हेही वाचा – Covishield च्या डोसांमध्ये १२ ते १६ आठवड्यांचे अंतर ठेवा, सरकारी पॅनेलची सूचना

 

First Published on: May 13, 2021 2:43 PM
Exit mobile version