घरCORONA UPDATECovishield च्या डोसांमध्ये १२ ते १६ आठवड्यांचे अंतर ठेवा, सरकारी पॅनेलची सूचना

Covishield च्या डोसांमध्ये १२ ते १६ आठवड्यांचे अंतर ठेवा, सरकारी पॅनेलची सूचना

Subscribe

कोव्हिशिल्ड लसीच्या दोन डोसांमध्ये ४ ते ८ आठवड्यांचा फरक १२ ते १६ आठवड्यांपर्यंत वाढवण्याच्या सूचना

देशात सध्या कोरोनावर प्रतिबंधात्मक अशा कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या लसी उपलब्ध आहेत. सरकारी पॅनलने ऑक्सफर्ड अँस्ट्रॅजेनेकाच्या कोव्हिशिल्ड लसीच्या दोन डोसांमधील अंतर वाढविण्याचा विचार करत आहेत. राष्ट्रीय लसीकरण तांत्रिक सल्लागारांनी कोव्हिशिल्ड लसीच्या दोन डोसांमधील अंतर १२ ते १६ आठवड्यांपर्यंत वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोव्हिशिल्ड लसीच्या दोन डोसांमध्ये ४ ते ८ आठवड्यांचा फरक असावा असे सांगण्यात आले होते. आता हे अंतर वाढवून १२ ते १६आठवडे करण्याची शिफारस करण्यात आली आहे. पॅनेलमध्ये असेही म्हटले गेले आहे की, प्रेग्नेंट स्रियांना कोरोनाची कोणतीही लस दिली जाऊ शकते. त्याचबरोबर स्तनपान करणाऱ्या स्रियाही प्रसुतीनंतर कधीही कोरोना लस घेऊ शकतात.

NTGIनेप्रयोगशाळेत ज्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे त्यांचे लसीकरण सहा आठवड्यांनी स्थगित केले जावे. पॅनेलमध्ये झालेल्या चर्चेत कोव्हॅक्सिन लसीच्या डोसमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. NVTIने कोव्हिशिल्ड लसीबाबत केलेल्या शिफारसी राष्ट्रीय तज्ञांकडे पाठविण्यात येणार आहेत.

- Advertisement -

सीरम इंस्टिट्यूटमध्ये दर मिनिटाला कोव्हिशिल्ड लसीच्या ५ हजार कुप्या तयार होतात. प्रत्येक कुपीमध्ये १० डोस असतात. एक कुपी उघडल्यानंतर तिचा पुढील ४ ते ५ तासांत वापर होणे गरजेचे आहे. कोव्हिशिल्ड लस ही ७० टक्क्यांपर्यंत प्रभावी ठरत आहे. म्हणून देशात कोव्हिशिल्ड लसीसाठी जास्त मागणी आहे. कोव्हिशिल्ड लस २ ते ८ डिग्री सेल्सिअस तापमानात साठवून ठेवली जाते. सध्या सीरम इंस्टिट्यूटमध्ये २ हजार कोटी लसीच्या कुप्या साठवून ठेवण्याची क्षमता आहे.


हेही वाचा – लस, ऑक्सिजन आणि औषधांसोबत पंतप्रधानही गायब; राहुल गांधीची मोदी सरकारवर जहरी टीका

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -