Vaccination: आता आधार कार्ड शिवाय घेता येणार लस, UIDAIचे स्पष्टीकरण

Vaccination: आता आधार कार्ड शिवाय घेता येणार लस, UIDAIचे स्पष्टीकरण

प्रातिनिधिक छायाचित्र

देशात मोठ्या प्रमाणात लसीकरण सुरु आहे. देशात लसीकरणासाठी आधार कार्ड दाखवणे गरजेचे आहे. मात्र आता आधार कार्ड नसेल तरीही लस घेता येणार आहे. त्याचप्रमाणे औषधे खरेदी करणे, तसेच रुग्णालयात दाखल होतानाही उपचार सुरु करण्याआधी आधार कार्ड दाखवण्याची  गरज नाही,असे युनिक आयडेंटिफिकेशन ऑफ इंडिया म्हणजेच UIDAIने स्पष्ट केले आहे. एखाद्या व्यक्तिकडे आधार कार्ड नसल्यास त्याला कोरोना लस घेण्यापासून वंचित ठेवता येऊ शकत नाही, असे UIDAIने म्हटले आहे. त्यामुळे लसीकरण करण्यासाठी त्याचप्रमाणे कोणत्याही रुग्णालयात उपचारांसाठी भरती होताना आधार कार्ड नसल्यास औषधे आणि इतर वैद्यकीय सुविधांसाठी मिळाणारे नकार बंद होतील.

UIDAIने घेतलेला हा निर्णय देशातील सर्व नागरिकांसाठी फार महत्त्वाचा आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना लसी घेणाऱ्या त्याचप्रमाणे उपचारांसाठी रुग्णालयात भरती होणाऱ्या रुग्णांना आधार कार्ड नसल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. UIDAIने घेतलेल्या या महत्त्वाच्या निर्णयामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

UIDAIने असे देखिल म्हटले आहे की, जर काही कारणास्तव नागरिकांकडे आधार कार्ड नसेल तर आधारच्या कायद्यानुसार त्यांना आवश्यक सेवांसाठी नाकारता येणार नाही. आधार कार्ड नसल्याने किंवा आधार कार्डचे ऑनलाईन व्हेरिफिकेशन झाले नसले तरी संबंधित विभागाला किंवा एजंसीला त्या नागरिकास सेवा द्यावा लागतील. आधार कार्ड नसल्यास एखादी आवश्यक सेवा देण्यास नकार देण्यात आला तर त्यासंबंधी वरिष्ठ अधिकाऱ्याकडे तक्रार करावी असे UIADIकडून सांगण्यात आले आहे.


हेही वाचा – काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांचं निधन

First Published on: May 16, 2021 11:12 AM
Exit mobile version