Vaccine: चीनच्या Sinovac लसीला आपत्कालीन वापरासाठी WHO कडून मान्यता

Vaccine: चीनच्या Sinovac लसीला आपत्कालीन वापरासाठी WHO कडून मान्यता

Vaccine: चीनच्या Sinovac लसीला आपत्कालीन वापरासाठी WHO कडून मान्यता

जगभरात कोरोना संक्रमण रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहिम सुरु आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) आतापर्यंत अनेक लसींना मान्यता दिली आहे. अनेक कंपन्यांनी कोरोना विरोधी लस तयार केली आहे.त्यातच आता WHOने चीनच्या साइनोव्हॅक बायोटेक ( Sinovac) या लसीला आपत्कालीन वापरासाठी मान्यता दिली आहे. WHOने मान्यता दिलेली चीन मधील ही दुसरी लस आहे. तज्ज्ञांच्या मते १८ वर्षांवरील लोकांना ही लस देण्यात येणार आहे. पहिल्या आणि दुसऱ्या डोसमध्ये २ ते ३ आठवड्यांचा फरक ठेवून ही लस देण्यात येणार आहे. (Vaccine: China Sinovac vaccine approved by WHO for emergency use)

WHOने दोन महिन्यात चीनच्या दोन लसींना मान्यता दिली आहे. एप्रिल महिन्यात चीनच्या सिनोफार्मा (Synopharma) या लसीला WHO ने मान्यता दिली होती. AFP ने दिलेल्या माहितीनुसार, चीन व्यतिरिक्त २२ देशांमध्ये ही लस आधीपासून वापरात आहे. ज्यात चिली,ब्राझील,इंडोनेशिया,मॅक्सिको,थायलँड आणि तुर्की या देशांचा समावेश आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून भारतातील भारत बयोटेकची कोव्हॅक्सिन (Covaxin) लस  आपत्कालीन वापरासाठी WHOकडून मान्यता मिळण्याच्या प्रतिक्षेत आहे. कोव्हॅक्सिनच्या आपत्कालीन वापरासाठीच्या यादीत नोंद करण्यासाठी भारत बायोटेकने ९० टक्के कागदपत्रे WHOकडे जमा केली आहेत. WHO दिलेल्या माहितीनुसार, भारत बायोटेकने १९ एप्रिल रोजी EOI सादर केले आहे. त्या संदर्भात आणखी काही माहिती देणे आवश्यक आहे. जून महिन्यात कोव्हॅक्सिनला WHO कडून आपत्कालीन ch वापरासाठी मंजूरी मिळण्याची शक्यता आहे, असे भारत बायोटेककडून सांगण्यात आले आहे.


हेही वाचा – देशात चौथ्या Sero Surveyची तयारी सुरु, २८ हजार लोकांचे घेण्यात येणार सँम्पल्स

 

First Published on: June 1, 2021 11:02 PM
Exit mobile version