ट्विटरवर 20-30 रुपयांना मुलींचे अश्लील व्हिडीओ; महिला आयोगाकडून फोटोंसह पुरावा सादर

ट्विटरवर 20-30 रुपयांना मुलींचे अश्लील व्हिडीओ; महिला आयोगाकडून फोटोंसह पुरावा सादर

चंदीगडच्या मोहालीतील विद्यापीठातील तरुणींचे एमएमएस शूट प्रकरण चर्चेत असून ज्याविरोधात देशभरातून संताप व्यक्त होत आहे. यात आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवरही चाइल्ड पॉर्नोग्राफीचे व्हिडीओ अपलोड होत असल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनीट ट्विटरवर चाइल्ड पोर्नोग्राफी व्हिडीओ शेअर होत असल्याचा दावा केला आहे. ज्यावरून एमएमएस प्रकरणाचे लोन ट्विटरपर्यंत पोहचल्याचे म्हटले जात आहे.

स्वाती मालिवाल यांनी दावा केला की, जगातील सर्वात मोठ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपैकी एक असलेल्या ट्विटर लहान मुलांचे अश्लील व्हिडीओ विकण्याचे माध्यम बनले आहे. ट्विटरवर लहान मुलींच्या बलात्काराचे अनेक व्हिडीओ आहेत, जे 20- 30 रुपयांना विकले जात आहेत. याप्रकरणी महिला आयोगाने ट्विटर इंडियाच्या प्रमुखाला समन्स बजावण्यात आला आहे. यावर मालीवाल म्हणाल्या की, ट्विटर इंडियाच्या प्रमुखांना दिल्ली महिला आयोगाच्या कार्यालयात येऊन उत्तर देण्यासाठी समन्स देत बोलावले आहे. ट्विटर फक्त अमेरिकन कायद्याचे पालन करते का असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलच्या डीसीपींनाही समन्स बजावण्यात आला आहे. याप्रकरणी आयोगानेही तपास सुरु केला. दिल्ली पोलिसांकडून याप्रकरणी एफआयआरही नोंदवण्यात आला आहे.

दरम्यान ट्विटर इंडियाने आयोगाच्या समन्सला प्रतिसाद दिला नाही तर अटक वॉरंट जारी केले जाईल, दिल्ली महिला आयोगालाही तसे अधिकार असल्याची माहिती त्यांनी दिली. स्वाती मालीवाल यांनी ट्विट करत म्हटले की, जगातील सर्वात मोठ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपैकी एक, ट्विटर हे लहान मुलांचे अश्लील व्हिडिओ विकण्याचे माध्यम बनले आहे. अल्पवयीन मुलींवरील बलात्काराच्या व्हिडिओन ट्विटर भरले आहे. 20-30 रुपयांना मुलींचे अश्लील व्हिडिओ विकले जात आहेत.

लहान मुलींच्या बलात्काराचे व्हिडिओ हजारो लोक शेअर करत आहेत. छुप्या कॅमेऱ्यांद्वारे महिलांचे अंघोळ करतानाचे शूट केलेले व्हिडिओ टाकले जात आहेत. या कंपन्या परदेशातील कायद्यांचे पालन करतात मात्र भारतातील महिलांवरील अश्लीलता आणि बलात्काराकडे डोळेझाक करतात. असं ट्विट त्यांनी केले आहे.


दसऱ्याला आम्ही ‘शिवतीर्थ’वर जमणारच; शिवाजी पार्ककरीता शिवसेना ठाम

First Published on: September 20, 2022 7:27 PM
Exit mobile version