घरताज्या घडामोडीदसऱ्याला आम्ही 'शिवतीर्थ'वर जमणारच; शिवाजी पार्ककरीता शिवसेना ठाम

दसऱ्याला आम्ही ‘शिवतीर्थ’वर जमणारच; शिवाजी पार्ककरीता शिवसेना ठाम

Subscribe

मागील काही दिवसांपासून शिवसेना शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगीकरीता प्रयत्न करत आहे. मात्र, अद्याप शिवसेनेला परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे शिवसेना आता आक्रमक पवित्रा हाती घेण्याच्या तयारीत आहे. दोन्ही गटाकडून शिवाजी पार्कवर परवानगीसाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे.

मागील काही दिवसांपासून शिवसेना शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगीकरीता प्रयत्न करत आहे. मात्र, अद्याप शिवसेनेला परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे शिवसेना आता आक्रमक पवित्रा हाती घेण्याच्या तयारीत आहे. दोन्ही गटाकडून शिवाजी पार्कवर परवानगीसाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे. अद्याप कुणालाच पालिका प्रशासनाकडून परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे आज शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मुंबई महापालिकेच्या जी-उत्तर कार्यालयात धडक दिली. तसेच, यावेळी त्यांनी “आम्हाला आता परवानगी मिळो न मिळो शिवसैनिक मोठ्या संख्येनं शिवाजी पार्कवर जमणार आहेत”, असे म्हटले. (Shiv Sena bmc office Dussehra melava permission issue shinde group cm eknath shinde)

शिवसेनेचे उपनेते मिलिंद वैद्य यांच्यासह शिवसेना पदाधिकाऱ्यांचं एक शिष्टमंडळ पालिका कार्यालयात गेले होते. त्यावेळी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने महिना उलटून गेला तरी अद्याप परवानगी का दिली जात नाही? असा जाब महापालिका अधिकाऱ्यांना विचारला. त्यावेळी “22 ऑगस्टला शिवसेनेकडून दसरा मेळाव्यासाठी अर्ज करण्यात आला आहे. महिना उलटून गेला तरी परवानगी देण्यात आलेली नाही. विधी खात्यातून अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे परवानगी देत येत नसल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणे आहे. पण आम्हाला आता परवानगी मिळो न मिळो शिवसैनिक मोठ्या संख्येनं शिवाजी पार्कवर जमणार आहेत. प्रशासनावर आमचा काडीचाही विश्वास नाही”, असे शिवसेना उपनेते मिलिंद वैद्य म्हणाले. जी-उत्तर कार्यालयात अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.

- Advertisement -

“एकनाथ शिंदे यांच्याकडून जर बीकेसीतील मैदानासाठी अर्ज करण्यात आला आहे आणि त्यांना परवानगीही मिळाली आहे. मग शिंदे गटाचा मेळावा बीकेसीमध्ये होणार असेल तर आम्हाला शिवाजी पार्कवर परवानगी देण्यास काय हरकत आहे? कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न येतोच कुठे?”, असे मिलिंद वैद्य यांनी पालिका अधिकाऱ्यांना विचारले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर राज्यात भाजपाशी युती करून सरकार स्थापन केले. शिंदे-फडणवीस सरकार राज्यात स्थापन झाल्यापासून शिवसेनेच्या नेतेमंडळींकडून शिंदे गटाच्या आमदारांवर हल्लाबोल केला जात आहे. गद्दार, पन्नास खोके एकदम ओके… यांसारख्या शब्दांत एकनाथ शिंदे आणि शिंदे गटावर टीका केली जात आहे. दरम्यान, शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील वाद आता आणखीनच चिघळत चालला आहे. येत्या काही दिवसांत नवरात्रोत्सव राज्यभरात साजरा केला जाणार आहे. त्यानंतर दसऱ्याला दरवर्षी दादरच्या शिवाजी पार्कवर शिवसेनेचा मेळावा आयोजित केला जातो. मात्र आता या मेळाव्यावरून या दोघांमध्ये आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – आंधळी कोशिंबीर खेळताना चिमुकली चौथ्या मजल्यावरून पडली; डोक्याला जबर मार, मृत्यूशी झुंज सुरू

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -